coronavirus: क्वारंटाइन डॉक्टरांनाही कामाची सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 02:49 AM2020-05-12T02:49:02+5:302020-05-12T02:49:25+5:30
रुग्णांना सेवा देणाऱ्यांच्याच आरोग्याकडे व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आणखी एका २७ वर्षीय वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा अधिकारी मेडिसीन विभागातीलच असून रुग्णांना सेवा देणाऱ्यांच्याच आरोग्याकडे व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे. या रुग्णालयात ४ वैद्यकीय अधिकारी आणि एका कर्मचारी महिलेला कोरोनाची लागण झाली असून, क्वारंटाइन केलेल्या अधिकाºयांना कामावर येण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप निवासी वैद्यकीय अधिकाºयांनी केला आहे.
या रुग्णालयात आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले सर्व वैद्यकीय अधिकारी हे मेडिसीन विभागातील असून त्यांच्या संपर्कातील ९ वैद्यकीय अधिकाºयांना क्वॉरंटाइन केले आहे. यातीलच वैद्यकीय अधिका-याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यांच्या संपर्कातील आणि क्वॉरन्टाइन केलेल्या ८ वैद्यकीय अधिकाºयांना कामावर येण्याची सक्ती केली जात आहे. यासाठी क्वॉरंटाइन सेंटरवर गाड्यादेखील पाठवल्या जात आहेत. कामावर हजर झाले नाहीत तर जेवण देणार नाही, याशिवाय वेतन रोखण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याची माहिती एका निवासी वैद्यकीय अधिकाºयाने दिली.