Coronavirus : दहा विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर उर्वरित मुंबईपेक्षा अधिक, बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 03:38 AM2020-09-05T03:38:48+5:302020-09-05T03:38:54+5:30

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या तीन दिवसांमध्ये दुप्पट होत होती. रुग्ण वाढीचा दर २० दिवसांवर नेण्यासाठी महापालिकेने सनदी अधिकाऱ्यांची फौज उभी केली.

Coronavirus : The rate of outbreaks in the ten divisions is higher than in the rest of Mumbai, with a sharp increase in the number of cases | Coronavirus : दहा विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर उर्वरित मुंबईपेक्षा अधिक, बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ

Coronavirus : दहा विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर उर्वरित मुंबईपेक्षा अधिक, बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ

Next

मुंबई : कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९३ दिवसांवर नेण्यास दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेला यश आले होते. मात्र गणेशोत्सव काळात तसेच लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे मुंबईतील दैनंदिन रुग्ण वाढीचा सरासरी दर आता ०.९० वर पोहोचला आहे. तसेच दहा विभागांमध्ये हा दर ०.९६ ते १.४६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या तीन दिवसांमध्ये दुप्पट होत होती. रुग्ण वाढीचा दर २० दिवसांवर नेण्यासाठी महापालिकेने सनदी अधिकाऱ्यांची फौज उभी केली. चेसिंग द वायरस या मोहिमेमुळे जास्तीतजास्त लोकांची तपासणी, तात्काळ निदान व त्वरित उपचार होऊ लागले. त्यामुळे रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ९३ दिवसांवर पोहोचला होता. मात्र गणेशोत्सव काळात बाजारपेठ, काही सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी दिसून आली. परिणामी काही विभागांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे आता दिसून येत आहे.
विशेषत: पश्चिम उपनगरात दहिसर, बोरवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी पश्चिम, वांद्रे पश्चिम तर शहर भागात भुलेश्वर, पेडर रोड, मलबार हिल आणि पूर्व उपनगरात मुलुंड विभागातील दैनंदिन रुग्ण वाढीचा दर मुंबईतील सरासरीपेक्षा अधिक आहे.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने नागरिक आता सार्वजनिक ठिकाणी फिरू लागले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित होते. त्यानुसार पालिका यंत्रणा सतर्क असून रुग्णालयात आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिका?्याने सांगितले.

आर मध्य बोरीवली - आतापर्यंत ८६३३ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ६७११ कोरोनामुक्त तर २८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अद्याप १६३७ रुग्ण उपचार घेत आहेत. येथे आता
४८ दिवसांनंतर रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.

आर दक्षिण कांदिवलीत आतापर्यंत ७५१३ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ५९४१ कोरोनामुक्त तर २३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अद्याप १३३६ रुग्ण राहिले आहेत. ५७ दिवसांनंतर रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.

एच पश्चिम वांद्रे प. -
आतापर्यंत ४३६७ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३४२९ बरे झाले. १९९ रुग्णांचा मृत्यू झाला तर ७३९ रुग्ण सक्रिय आहेत.
५० दिवसांनंतर रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.

प्रशासन सतर्क
विशेषत: पश्चिम उपनगरात दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी पश्चिम, वांद्रे पश्चिम तर शहर भागात भुलेश्वर, पेडर रोड, मलबार हिल आणि पूर्व उपनगरात मुलुंड विभागातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर मुंबईतील सरासरीपेक्षा अधिक आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने नागरिक आता सार्वजनिक ठिकाणी फिरू लागले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित होते. त्यानुसार यंत्रणा सतर्क आहे.
 

Web Title: Coronavirus : The rate of outbreaks in the ten divisions is higher than in the rest of Mumbai, with a sharp increase in the number of cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.