मुंबई: मागील काही दिवसांत शहर उपनगरांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे लवकरच शहर उपनगरातील कोविडचा संघर्ष आटोक्यात येत असल्याची सकारात्मक बाब समोर येत आहे. शहर उपनगरात ७३ टक्के रुग्ण कोविडमुक्त झाले आहे. तर रुग्ण दुपटीचा काळ ६६ दिवसांवर पोहोचला आहे. १९ ते २४ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.०६ टक्के नोंदविला आहे.
मुंबईत शनिवारी १ हजार ८० रुग्ण व ५२ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. यामुळे आतापर्यंत १ लाख ८ हजार ६० कोरोना रुग्ण झाले असून ६ हजार ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ हजार ८७६ इतकी असून सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार ८५४ आहे. मुंबईत आतापर्यंत ४ लाख ७० हजार ३३० कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ५२ मृत्यूंमध्ये ४० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ३० रुग्ण पुरुष व २० रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४ जणांचे वय ४० वर्षांखाली होते. तर ३३ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक आहे. उर्वरित १५ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील आहेत.
कर्करुग्णांच्या समुपदेशनासाठी निःशुल्क हेल्पलाईनकोविडच्या काळात कर्करोग असणाऱ्या व्यक्तींना विशेषतः ज्यांना वेदनाशामक अशा काळजीची व आधाराची गरज आहे. अशा व्यक्त व त्यांचे कुटुंबिय केवळ संबंधित रुग्णाचे आजारपण नव्हे तर कोरोनाच्या भीतीने देखील चिंतेत आहेत. अशा रुग्णांच्या त्यांच्या कुटुंबीयांसाठी व टाटा रुग्णालयाने सिप्ला फांऊडेशनच्या सहाय्याने हेल्पाईन क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे. हेल्पाईन क्रमांक ९५११९४८९२० या निःशुल्क क्रमांकावर समुपदेशनासह आधार देण्यात येणार आहे. ही हेल्पलाईन सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरु राहिल. कर्करुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना या हेल्पलाईनचा लाभ घेता येणार आहे.