Coronavirus: कोरोनामुक्त पोलिसांना प्रमाणपत्राशिवाय हजर करून घ्या; पोलीस आयुक्ताचे आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 09:23 PM2020-06-14T21:23:20+5:302020-06-14T21:23:37+5:30

कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील 26 जणांचा बळी गेला आहे.तर जवळपास 900 जणांना त्याची लागण झाली आहे.त्यापैकी निम्मे कोरोनामुक्त झाले आहेत

Coronavirus: Report to coronavirus without a certificate; Order of the Commissioner of Police | Coronavirus: कोरोनामुक्त पोलिसांना प्रमाणपत्राशिवाय हजर करून घ्या; पोलीस आयुक्ताचे आदेश  

Coronavirus: कोरोनामुक्त पोलिसांना प्रमाणपत्राशिवाय हजर करून घ्या; पोलीस आयुक्ताचे आदेश  

Next

मुंबई -  कोरोनाची वाढती लागण मुंबई पोलीस दलासाठी चिंतेचा विषय असताना या विषाणूपासून मुक्त झालेल्याना पुन्हा कर्तव्यावर हजर होण्यासाठी येणारी अडचण आता दुर झाली आहे. संबधितांना पोलीस रुग्णलयाच्या  प्रमाणपत्राशिवाय नियुक्तीच्या ठिकाणी हजर होता येणार आहे,  पोलीस आयुक्त परमबीर सिह यांनी त्याबाबतचे आदेश सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील 26 जणांचा बळी गेला आहे.तर जवळपास 900 जणांना त्याची लागण झाली आहे.त्यापैकी निम्मे कोरोनामुक्त झाले आहेत. तर तितक्याच जणांना क्वारटाईन करण्यात आले आहे. सुरुवातीला कोरोनाग्रस्तावर उपचार झाल्यानंतर त्याचा निगेटिव्ह अहवाल येईपर्यंत  चाचणी घेतली जात असे, मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याबाबत नव्याने जारी केलेल्या निकषामध्ये कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्यांची डिस्चार्ज करताना पुन्हा  कोविड-19 चाचणी घेण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांची  तपासणी केली जात नाही.मात्र अशा पोलिसांना त्याचा अहवाल नसल्याने पुन्हा ड्युटीवर हजर होण्यासाठी नागपाडा पोलीस रुग्णालयातून कर्त्यव्यावर  हजर होण्यास फीट  असल्याबद्दल प्रमाणपत्र दिले जात नव्हते. त्यामुळे संबंधित अधिकारी, अंमलदाराना हजर होण्यासाठी अडचण येत होती. ही बाब लक्षात घेऊन सौम्य लक्षणे असलेल्या ज्या पोलिसांनी  कोविड केअर सेंटरमध्ये 10 दिवसाचा उपचार व 3 दिवस होम  क्वारंटाईन केले आहे, तसेच तीव्र लक्षणे आढळलेल्यानी रुग्णालयात पुर्ण उपचार आणि 7 दिवसाचे  होम क्वारटाईन केले आहे. त्यांना तातडीने हजर करून घ्याबे, असे आदेश पोलीस आयुक्त परमबीर सिह यांनी सर्व प्रभारी अधिकार्यांना बजाविले आहेत.

पोलिसांच्या आयुक्तालयातंर्गत बदल्यानांही यंदा फाटा !

कोरोनाच्या महामारीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असताना आता याच कारणामुळे पोलीस अधिकारी, अंमलदाराच्या आयुक्तालय, जिल्ह्यातर्गत बदल्याना  मनाई करण्यात आली आहे. पोलीस घटकप्रमुखानी यावर्षी कोणत्याही प्रकारची बदली करू नये, अशी सूचना पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी केली आहे. या निर्णयामुळे बदलीसाठी पात्र असणाऱ्याना एक वर्षासाठी आपसूकच मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे पोलीस दलात 'कही ख़ुशी कही गम' चे वातावरण आहे. 

अधिकाऱ्यांना एका पोलीस ठाण्यात दोन वर्षे तर अंमलदाराना पाच वर्षाचा कालावधीत निश्चित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 'साईड  ब्रँच' ला असणाऱ्यासाठी तीन वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. मात्र यंदा कोरोनामुळे राज्य सरकारने  पहिल्यांदा आयुक्तालय व जिल्हयाबाहेर सर्व बदल्याना स्थगिती दिली होती. मात्र सामान्य प्रशासन विभागाने आर्थिक टंचाईमुळे घटकातर्गत बदल्या न करण्याचे आदेश सर्व विभागाना दिले आहेत. त्यानुसार पोलीस महासंचालकानी सर्व  पोलीस घटकप्रमुखांना त्याबाबत सूचना केल्या आहेत.

Web Title: Coronavirus: Report to coronavirus without a certificate; Order of the Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.