मुंबई - राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी काही रुग्णालयांकडून अवास्तव शुल्क आकारण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अवास्तव शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांना इशारा दिला आहे. कोरोनावरील उपचारांसाठी कुठल्याही रुग्णालयांना अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही. तसेच कोरोनावरील उपचारांसाठी कुठल्या रुग्णालयाने अतिरिक्त शुल्क आकारल्यास त्याबद्दल तक्रार करा, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज फेसबूक लाइ्व्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी राजेश टोपे म्हणाले की,’कोरोनावरील उपचारांसाठी कुठल्याही रुग्णालयांना अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही. तसेच कोरोनावरील उपचारांसाठी कुठल्या रुग्णालयाने अतिरिक्त शुल्क आकारल्यास त्याबद्दल तक्रार करा,’
दरम्यान, कोरोना रुग्णांच्या वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आम्ही मुंबईत दोन हजार अतिरिक्त बेड उपलब्ध करण्याची व्यवस्था केली आहे. तसेच कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यास त्यावर उपचार करण्यासाठी बीकेसी, रेसकोर्स, गोरेगावात रुग्णालय उभारण्याची तयारी आम्ही केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवर येत असलेल्या ताणामुळे आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आरोग्यसेवेसाठी लष्कर, रेल्वे आणि इतर सेवांची मदत घेणार आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या...
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण
OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली
CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले
दरम्यान, राज्यात आतापर्यंत सुमारे दोन लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. चाचण्या अधिक झाल्यामुळे रुग्ण अधिक सापडले असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच क्वारेंटाइनमध्ये ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तींचा क्वारेंटाइन कालावधी कमी करण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग झाला असेल किंवा तशी लक्षणे दिसत असतील, तर अशी माहिती लपवू नका असे आवाहनही टोपे यांनी केले.