Coronavirus: पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध; दोन्ही राज्यं संवेदनशील आपत्ताचं ठिकाण घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 10:32 PM2021-05-01T22:32:35+5:302021-05-01T22:34:11+5:30
राज्य सरकार तर्फे जारी एका आदेशात सदर माहिती देण्यात आली असून १८ एप्रिल २०२१ रोजी जाहीर केलेल्या आदेशात असलेल्या ठिकाणांना व्यतिरिक्त हे दोन ठिकाण त्यात सामील असतील.
मुंबई - इतर ठिकाणाहून राज्यात होणारा कोविड-१९ चा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि राज्य मध्ये त्याच्या अंकुश लावण्यासाठी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांना संवेदनशील आपत्तीचे ठिकाण घोषित करण्यात आले आहे.
राज्य सरकार तर्फे जारी एका आदेशात सदर माहिती देण्यात आली असून १८ एप्रिल २०२१ रोजी जाहीर केलेल्या आदेशात असलेल्या ठिकाणांना व्यतिरिक्त हे दोन ठिकाण त्यात सामील असतील. सदर आदेश निघाल्यापासून जोपर्यंत सदर आदेश परत घेतला जात नाही किंवा कोविड-१९ आपत्ती म्हणून अधिसूचित राहते तोपर्यंत हे दोन्ही ठिकाण संवेदनशील उत्पत्ती चे ठिकाण म्हणून ग्राह्य धरण्यात येतील. संवेदनशील ठिकाणांसाठी आतापर्यंत निघालेल्या पत्रकांत यांच्या माध्यमातून ज्या ज्या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एस ओ पी) घोषित करण्यात आले आहेत ते सर्व एस ओ पी या दोन ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असेल.
महाराष्ट्रात दिवसभरात ६३ हजार २८२ कोरोनाबाधित तर ८०२ जणांना मृत्यू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे. राज्यात शनिवारी ६३ हजार २८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर दिवसभरात ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात २४ तासांत ६१ हजार ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ३९ लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४.२४ टक्के एवढे झालं आहे.
राज्यात २४ तासांत ८०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ६ लाख ६३ हजार ७५८ इतकी आहे.
राज्यात आज मुंबईत ३८९७, ठाणे १९८३, नाशिक ५४१४, अहमदनगर ४००६, पुणे ८००७ इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण ८०२ मृत्यूंपैकी ४३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १८६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १८६ मृत्यू, पुणे-३८, औरंगाबाद-२७, नाशिक-२४, भंडारा-१९, नागपूर-१८, ठाणे-१७, चंद्रपूर-११, रायगड-६, सोलापूर-४, नांदेड-३, यवतमाळ-३, हिंगोली-२, जळगाव-२, जालना-२, नंदूरबार-२, परभणी-२, बीड-१, कोल्हापूर-१, उस्मानाबाद-१, पालघर-१, सातारा-१ आणि वर्धा-१ असे आहेत.