CoronaVirus: घरातून आर.जे. सोडवत आहेत नागरिकांच्या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 01:48 AM2020-04-24T01:48:50+5:302020-04-24T01:49:05+5:30

सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी संवाद; कोरोनाविषयी जनजागृती

CoronaVirus: R.J. Solving the problems of the citizens | CoronaVirus: घरातून आर.जे. सोडवत आहेत नागरिकांच्या समस्या

CoronaVirus: घरातून आर.जे. सोडवत आहेत नागरिकांच्या समस्या

Next

- कुलदीप घायवट 

मुंबई : ‘गुड मार्निंग मुंबई’ असा कानावर आवाज पडल्यावर लगेच आर.जे.ची आठवण येते. मुंबईतील प्रत्येक घटनेची माहिती आर.जे.कडून दिली जाते. मात्र आता लॉकडाउन काळात आर.जे. काय करत असतील. तर, आर.जे. घरात बसून नागरिकांना जोडण्याचे, प्रोत्साहन देण्याचे, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम करत आहेत.

घरामध्ये रेडिओ जॉकीच्या आॅफिसचे वातावरण तयार केले आहे. यातून नागरिकांशी संपर्क साधला जात आहे. सेलिब्रिटींशी गप्पागोष्टी सुरू आहेत. यासह नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. तर, काही आर.जे. फिल्डवरून काम करून किंवा सोशल मीडियावरून नागरिकांना कोरोनाविषयी जागृत करत आहेत. यामुळे तरी नागरिक घरी राहतील, अशी अपेक्षा करायला हवी़

लॉकडाउनआधी रोज सकाळी कामावर जात होते. पण आता घरात बसून काम सुरू आहे. एक लॅपटॉप, माईक, हेडफोन आणि रेडिओचे सॉफ्टवेअर आहे. नेहमीपेक्षा जास्त ऊर्जेने काम करत आहे. आता लाइव्ह करता येत नाही. मात्र या काळात अनेक नागरिकांच्या तक्रारी येतात. या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करते आणि त्यात यशस्वीदेखील होते. जुहूनगर येथे काहींना जेवणाची सोय नव्हती. ती करून दिली. कोरोना काळात काम करणारे अनेक कर्मचारी दुर्लक्षित आहेत. उदा. सिलिंडरची ने-आण करणारे कर्मचारी. त्यामुळे त्यांच्या समस्या माझ्या कार्यक्रमातून मांडल्या. यासह सेलिब्रिटी टॉक शोदेखील सुरू आहे. सलमान खान, विद्या बालन यांच्याशी गप्पागोष्टी लॉकडाउन काळात केल्या आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीदेखील संवाद सुरू असतो.
- आर.जे. मलिष्का

सध्याची परिस्थिती गंभीर आहे. प्रत्येक जण कुठल्यातरी अडचणी सापडला आहे. मात्र यातून सुटका कशी होईल, यावर नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. घरातून किंवा प्रत्यक्ष फिल्डवर उतरून लोकांशी संवाद साधत आहे. किराणा, मेडिकल सामग्री घेताना कोणत्या अडचणी येतात. त्या कशा सोडवायच्या यावर भर देत आहे. मुंबईत सील केलेल्या भागांतील लोकांशी फोनद्वारे संपर्क करणे, त्यांच्या भावना जाणून घेण्याचे काम आता सुरू आहे. बॉलीवूड गॉसिप्स, जास्तीचे मनोरंजन बंद करून नागरिकांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत.
- आर.जे. अनिरुद्ध चावला

Web Title: CoronaVirus: R.J. Solving the problems of the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.