कोरोनाचा थेट मुकाबला करत देशवासीयांचे रक्षण करणारे लाखो डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस दल आणि इतर कोरोना योद्ध्यांना संरक्षण दलांनी रविवारी अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. या देशव्यापी कृतज्ञता सोहळ्याचा भाग म्हणून मुंबईतील कोविड रुग्णालयांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, तर सुखोई या लढाऊ विमानाने मुंबईच्या अवकाशात भरारी घेतली.10 वाजल्यापासून भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाची हेलिकॉप्टर्स मुंबईतील अवकाशात घिरट्या घालत होती. केईएम रुग्णालय, जेजे रुग्णालय आणि कस्तुरबा गांधी या कोविड रुग्णालयांवर या हेलिकॉप्टर्समधून पुष्पवृष्टी करण्यात आली. संरक्षण दलांनी दिलेल्या या मानवंदनेने रुग्णालयातील योद्धेसुद्धा हरखून गेले होते.सुखोई २० या लढाऊ विमानाने दक्षिण मुंबईत फ्लाइंग मार्च केला. मलबार हिल येथील राजभवन, मरिन ड्राइव्ह परिसरातून उत्तर-दक्षिण अशी झेप घेत या विमानांनी सलामी दिली. तर, सायंकाळी मुंबई किनारपट्टीलगत तटरक्षक दल व नौदलाच्या जहाजांवर रोषणाई करण्यात आली. गेट वे आॅफ इंडिया येथे संध्याकाळी साडेसात ते रात्री बारा वाजेपर्यंत नौदलाच्या १५ जहाजांवर रोषणाई करण्यात आली. इंडिया सॅल्युट्स कोरोना वॉरियर्स असा मजकूर त्यावर लिहिलेला होता.
संरक्षण दलांकडून कोरोनाच्या थेट मुकाबला करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस दल आणि इतर कोरोना योद्ध्यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. या देशाव्यापी कृतज्ञता सोहळ्याचा भाग म्हणून मुंबईतील कोविड रूग्णालयांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तर सुखोई या लढाऊ विमानाने मुंबईच्या अवकाशात भरारी घेत दक्षिण मुंबईत फ्लार्इंग मार्च केला, तर सायंकाळी मुंबई किनारपट्टीलगत तटरक्षक दल आणि नौदलाच्या जहाजांवर रोषणाई करण्यात आली. गेट वे आॅफ इंडिया येथे संध्याकाळी साडेसात ते रात्री बारा वाजेपर्यंत नौदलाच्या १५ जहाजांवर रोषणाई करण्यात आली. इंडिया सॅल्युट्स कोरोना वॉरियर्स असा मजकूर लिहिलेले फलक झळकविण्यात आले होते. जहाजांवर भोंगा वाजवून साडेसात वाजता विद्युत रोषणाई करण्यात आली.