Coronavirus : दिलासादायक! सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 08:04 PM2022-01-11T20:04:19+5:302022-01-11T20:05:52+5:30
Coronavirus in Mumbai: सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. आज मुंबईमध्ये ११ हजार ६४७ रुग्णांची नोंद झाली. तर १४ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक अशी वाढ होत आहे. त्यातच मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढ ही २० हजारांपर्यंत पोहोचल्यामुळे चिंतेत भर पडली होती. मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून काहीसा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. आज मुंबईमध्ये ११ हजार ६४७ रुग्णांची नोंद झाली. तर १४ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली.
कोरोनाच्या आजच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये आज कोरोनाचे ११ हजार ६४७ नवे रुग्ण सापडले. तर दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरामध्ये १४ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच दिवसभरात मुंबईमध्ये कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र चिंतेची बाब म्हणजे मुंबईमध्ये कोरोनाचे अद्यापही १ लाख ५२३ सक्रिय रुग्ण आहेत.
COVID19 | Mumbai reports 11,647 fresh cases & 2 deaths today; Active cases at 1,00,523 pic.twitter.com/tKe8cvHzsu
— ANI (@ANI) January 11, 2022
दरम्यान, मुंबईत काल सोमवारीही दैनंदिन रुग्णांमध्ये घट दिसून आली होती. रविवारी १९ हजारांच्या घरात असणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येत सोमवारी घट होऊन १३,६४८ रुग्णांची नोंद झाली होती, तर ५ मृत्यू झाले होते. काल सापडलेल्या दिवसभरातील १३ हजार रुग्णांपैकी ११ हजार ३२८ रुग्ण लक्षणविरहीत होते.