मुंबई: मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईत कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू असेल. पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असेल. तर सर्वसामान्यांना फक्त आवश्यक कामांसाठी केवळ २ किलोमीटरपर्यंत बाहेर पडता येईल. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. नागरिक घराबाहेर पडत असल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा शहरात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त प्रणय अशोक यांनी याबद्दलचे आदेश दिले आहेत. आज मध्यरात्रीपासून मुंबईत जमावबंदी लागू होईल. ती १५ जुलैपर्यंत कायम असेल. रात्री ९ ते पहाटे ५ या कालावधीत मुंबईत जमावबंदी लागू असेल. पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येईल. या कालावधीत सर्वसामान्यांना केवळ २ किलोमीटरपर्यंत प्रवास करता येईल. त्यातही हा प्रवास केवळ अत्यावश्यक कामांसाठीच करता येईल. मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा ७५ हजारांच्या पुढे गेला आहे. लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल केल्यापासून शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. त्यातच अनेक कार्यालयंदेखील सुरू झाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्यादेखील वाढली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांनी हजारो वाहनं जप्त केली आहेत. मात्र तरीही घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता शहरात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
कोरोनाची ३ नवी लक्षणं आढळली; 'हा' त्रास झाल्यास असू शकतो धोकामुख्यमंत्र्यांनी मानले आभार तर आरोग्यमंत्र्याचे डॉक्टरांसाठी भावनिक पत्रसंतापजनक! मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून कार्यालयातील दिव्यांग महिलेला बेदम मारहाण