Join us

Coronavirus: नायगावमध्ये सुरक्षेचा बोजवारा; पोलीस, महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 3:03 AM

रुग्ण वाढताहेत; नागरिक ऐकेनात

मुंबई : दादर, नायगाव येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ येथील स्थानिकांना याचे किंचितही गांभीर्य नाही़ रस्त्यावर विनाकारण फिरणे, दुकानांमध्ये गर्दी करणे, प्रतिबंध क्षेत्र जाहीर केल्यानंतरही घरातून बाहेर पडणे असे प्रकार येथे सुरू आहेत़ पोलीस, महापालिका हे सर्व बघूनही काहीच ठोस कारवाई करीत नाही.त्यामुळे भविष्यात येथील परिस्थितीही हाताबाहेर जाण्याची शक्यता असून ती आटोक्यात आणणे कठीण होऊन बसणार आहे़

नायगावमध्ये पोलीस मुख्यालय आहे़ बीडीडी चाळ, कोहिनूर मिल, स्प्रिंग मिल चाळ अशा प्रशस्त व शेकडो खोल्या असलेल्या चाळी आहेत़ येथील बहुतांश खोल्या दहा बाय दहाच्या आहेत़ पोलिसांची वसाहत आहे़ हा परिसर ‘कामगार वस्ती’ म्हणूनच ओळखला जातो़ त्यामुळे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता अधिक आहे़ परिणामी, पोलीस, पालिकेने या विभागाकडे अधिक लक्ष द्यायला हवे़ मात्र तसे होताना दिसत नाही़ येथील भोईवाडा मार्केट सदाकांत ढवण मैदानात हलविण्यात आले आहे़ तेथे लोकांची तोबा गर्दी होते़ सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही़ महत्त्वाचे म्हणजे येथे हाकेच्या अंतरावर भोईवाडा पोलीस ठाणे आहे़ पोलिसांनी नागरिकांना रांगेत मैदानात सोडणे आवश्यक आहे़ पण तसे होत नाही़ येथील सुरक्षा वाऱ्यावर आहे़

पोलीस, रुग्णालयातील कर्मचारी सतत ड्युटीवर असतात़ कर्तव्यावर असताना काही पोलीस, रुग्णालय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे़ लागण झालेले व त्यांचे कुटुंबीय यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे़ असे असतानाही येथील परिसरातील गर्दी काही कमी होत नाही़ नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असतात़ दोन चाळींच्या आवारात गप्पांचा फड रंगतो़ यावर कोणाचेच नियंत्रण नाही़ पोलिसांची व्हॅन येते व ‘‘गर्दी करू नका,’’ एवढा संदेश देऊन जाते़ पोलिसांनी विनाकारण फिरणाºयांवर कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे़ येथील काही इमारतींमध्ये रुग्ण सापडल्याने त्या प्रतिबंधित केल्या आहेत़ त्या इमारतींजवळ पोलीस असणे आवश्यक आहे़ मात्र तेथे पोलीस नसतात़लोकप्रतिनिधी मदत करीत नाहीतया रुग्णालयात रुग्ण ठेवू नका़ लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना धोका होऊ शकतो, असे आम्ही आमदार कालीदास कोळंबकर व नगरसेविका ऊर्मिला पांचाळ यांना सांगितले़ मात्र वरून आदेश आहेत, आम्ही काहीच करू शकत नाही, असे उत्तर मिळाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले़याच परिसरात महानगरपालिकेचे प्रसूतिगृह आहे़ तेथे काही रुग्ण क्वारंटाइन करण्यात आले आहेत़ या रुग्णालयाच्या समोरच बीडीडी चाळी आहेत़ येथे रुग्ण आणले जात असताना त्यांचे साहित्य सर्रासपणे रस्त्यावर फेकून दिले जाते़ स्थानिकांनी तक्रार केल्यावर ते उचलले जाते़ समोरच चाळ असल्याने तेथील लहान मुले, वयोवृद्ध यांना धोका होऊ शकतो़ त्याचा विचार कोणीच केलेला दिसत नाही, असे येथील एका कर्मचाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले़आम्ही काळजी घेत आहोतरस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत़ पालिका अधिकाºयांसोबत बैठक झाल्यानंतर याबाबत ठोस पावले उचलली जातील़ - विनोद कांबळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, भोईवाडा

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस