Coronavirus: राज ठाकरेंच्या सुरात शरद पवारांनी मिसळला सूर, दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:06 PM2020-04-21T12:06:05+5:302020-04-21T12:08:18+5:30

कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याची सूचना वारंवार दिली जाते ती आपण पाळत नाही त्याचा परिणाम दिसून येतो.

Coronavirus: Sharad Pawar appeal media such as Raj Thackeray, Give Positive news about corona to people pnm | Coronavirus: राज ठाकरेंच्या सुरात शरद पवारांनी मिसळला सूर, दिला मोलाचा सल्ला

Coronavirus: राज ठाकरेंच्या सुरात शरद पवारांनी मिसळला सूर, दिला मोलाचा सल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाबद्दल जागरुकता निर्माण होणं गरजेचे आहे भीती नाहीसकारात्मक बातम्या मीडियाने देण्याची जबाबदारी घेतली पाहिजेनकारात्मक बातम्या न देता सकारात्मक, दिलासा आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या बातम्या द्या

मुंबई - आज संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. यात अमेरिकेसारख्या बलाढ्य आणि सर्वसोयी सुविधा असलेल्या देशातही कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४० हजारांच्या वर आहे. स्पेन, इटली, फ्रान्स येथे हजारोंच्या संख्येने लोकांचे मृत्यू होत आहे. याठिकाणची लोकसंख्या तुलनात्मकदृष्ट्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. भारतासारख्या देशात ५९० लोकांचे कोरोनामुळे मृत्यू झालेत. राज्यात २२३ लोकांचे कोरोनामुळे मृत्यू झालेत. २२३ हा आकडा राज्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. पण त्यांच्यापेक्षा राज्याची आणि देशाची परिस्थिती तुलनेने बरी आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

फेसबुक लाईव्ह दरम्यान शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. मृतांचा आकडा थांबवायचा कसा याचा विचार केल्याशिवाय पर्याय नाही. मुंबई, पुणे, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या परिसरात जी मार्गदर्शक सूचना दिली आहे त्याप्रमाणे कठोरतेने अंमलबजावणी करुन मृतांचा आकडा आणि कोरोना संक्रमण रुग्णांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने पावलं उचलावीच लागतील. या परिसरातील कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. हा परिसर वगळता राज्य सरकारनेही पूर्ण लॉकडाऊन न करता काही जिल्ह्यात सुविधा सुरु करणं शक्य आहे असंही ते म्हणाले.

तसेच कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याची सूचना वारंवार दिली जाते ती आपण पाळत नाही त्याचा परिणाम दिसून येतो. आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. घराबाहेर पडू नका अशी सूचना दिली जात आहे. राज्यातील अथवा देशातील मृतांचा आकडा चिंतनीय आहे. मात्र पाश्चिमात्य देशांपेक्षा हा आकडा खूप कमी आहे हेदेखील पाहिलं पाहिजे. नकारात्मक बातम्या न देता सकारात्मक, दिलासा आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या बातम्या देणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य देशापेक्षा भारताची परिस्थिती खूप चांगली आहे. लोक उपचार घेऊन परत जात आहे. याबाबत सकारात्मक बातम्या मीडियाने देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील मीडिया हे काळजी घेईल असा विश्वास वाटतो असा मोलाचा सल्ला पवारांनी दिला.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्य सरकारला अशाप्रकारे सूचना केली होती. सकारात्मक आकडेवारीमुळे लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होईल. कोरोनाबद्दल जागरुकता निर्माण होणं गरजेचे आहे भीती नाही. त्यामुळे कोरोनातून किती लोक बरे होतात, यांचा अनुभव लोकांपर्यंत पोहचवला पाहिजे असंही त्यांनी सुचवलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनेही कोरोनाबाबत सकारात्मक बातम्या देणं सुरु केलं होतं.

रमजान काळात मुस्लिमांनी घरातच नमाज पठण करावं

आता ४-५ दिवसांनी रमजान सुरु होईल. रमजानमध्ये लोक एकत्र येत मशिदीत नमाज पठण करतात. मात्र यावेळी नेहमीच्या भूमिकेत फरक करावा लागेल. रमजानमध्येही मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठण करावं, आपल्या शहराला, राज्याला आणि देशाला कोरोना संकटपासून मुक्ती मिळो अशी प्रार्थना करावी. हजारोंच्या संख्येने रमजानमध्ये लोक रस्त्यावर येतात. लॉकडाऊनमध्ये इतर लोकांनी सहकार्य केले तसेच रमजानमध्येही घरामध्येच बसून नमाज पठण करा, बाहेर पडू नका, लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली नाही. त्यामुळे राज्य सरकारला सहकार्य करा. सध्याच्या परिस्थितीबाबत मुस्लीम समाज विचार करेल. रोजा सोडण्यासाठी एकत्र येण्याची गरज नाही. अल्पसंख्याक समुदाय या कठीण प्रसंगात सहकार्य करतील असा विश्वास आहे असं शरद पवार म्हणाले.

Web Title: Coronavirus: Sharad Pawar appeal media such as Raj Thackeray, Give Positive news about corona to people pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.