Join us

coronavirus : ...तर पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवाच, सामनामधून भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 9:13 AM

गांभीर्य नसलेल्या विरोधी पक्षाच्या डोक्यात दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही

ठळक मुद्दे गांभीर्य नसलेल्या विरोधी पक्षाच्या डोक्यात दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाहीकेवळ कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बळाचा  वापर केला जात आहे.ही वेळ वादविवाद घालण्याची नाही, आरोपप्रत्यारोप करण्याची नाही. तर हातात हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचवण्याची आहे

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे कोरोनावरून राजकारणासही सुरुवात झाली आहे. कोरोनाबाबतच्या उपाययोजनांवरून आणि पोलिसांनाकडून होणाऱ्या कारवाईवरून राज्य सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर आज सामनामधून टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. प्रमुख विरोधी पक्षाने मुखमंत्री मदतनिधीबाबतही सवतासुभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधी पक्षाच्या डोक्यात दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही, असा टोला सामनामधून लागवण्यात आला आहे.

राज्यात आणि देशात कोरोनाबधितांची संख्या वेगाने वाढत आहे. ही बाब काही चांगली नाही. हिंदू-मुस्लिम असे विषय मांडून आणि मंदिर, मशीद, शाहीनबाग असले खेळ खेळून कोरोनाला हरवता येणार नाही. 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही लोक रस्त्यावर उतरत आहेत. वर पोलिसांनी दंडुका उगारल्यावर कायद्याचे राज्य आहे म्हणून सांगितले जाते. हो कायद्याचे राज्य आहे म्हणून पोलीस नुसते दंडुके उगारत आहेत.  मग भारतातही चीनप्रमाणे सहा हजार बळी जाऊ द्यायचे काय? असा सवालही सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे.

रज्यातील जनतेची काळजी केवळ विरोधी पक्षाला आहे आणि सरकार केवळ दंडुके घेऊन फिरत आहे. अशा आशयाची विधाने  विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस करत आहेत. पण आधीच्या सरकारच्या कार्यकाळात पोलिसांचा केवळ गैरवापर सुरू होता. आज केवळ कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बळाचा  वापर केला जात आहे. एका रुग्णामुळे 100 जणांना आणि 100 जणांमधून एक हजार जणांना कोरोनाची बाधा होणार असेल तर अशा लोकांच्या पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवा आणि रुग्णसेवाच आहे, असे सामनाच्या या अग्रलेखात म्हटले आहे.

तसेच ही वेळ वादविवाद घालण्याची नाही, आरोपप्रत्यारोप करण्याची नाही. तर हातात हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचवण्याची आहे. आमचा भाजपा वगळता सर्व विरोधी पक्षांशी संवाद सुरू आहे. मात्र प्रमुख विरोधी पक्षाने मुखमंत्री मदतनिधीबाबतही सवतासुभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधी पक्षाच्या डोक्यात दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही, असा टोला सामनामधून लागवण्यात आला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसराजकारणशिवसेनाभाजपा