Coronavirus: ‘ऊठसूठ राजभवनात जाऊन तक्रारी केल्यानं विरोधी पक्षाचं हसं होतंय त्यांनी असं करु नये’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 01:09 PM2020-04-23T13:09:25+5:302020-04-23T13:11:55+5:30
राज्यातील विरोधी पक्षाने वर्षा बंगल्यावर पोहचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधायला हवा.
मुंबई - विरोधी पक्षनेत्यांना मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं असेल तर त्यांना पूर्ण अधिकार आहे. या राज्यात विरोधी पक्षाचा सन्मान नेहमी ठेवला जातो. मात्र आता विरोधी पक्षाकडून राज्य सरकारच्या नावाने खडे फोडले जात आहे. राजभवनात जाऊन तक्रारी केल्या जात आहेत. मात्र त्यातून विरोधी पक्षाचे हसे होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक जनता करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने असं करु नये असा खोचक सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.
याबाबत संजय राऊत म्हणाले की, २७ मे तारखेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाचे सदस्य नसतील यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत ते अजून झोपेत आहे. २८ तारखेनंतरही हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उत्तम काम चालेल असा विश्वास आहे. कोणतंही सरकार राज्यपाल चालवू शकत नाही, मंत्रिमंडळाच्या शिफारशी स्वीकारणं हे घटनात्मक बंधनकारक आहे. कारण लोकनियुक्त हे सरकार आहे. राजकीय पेच निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे पण घटनेचा पेच नाही. हे सरकार टिकवणं राज्यपाल आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे असाही टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.
तसेच भूक लागली म्हणून अन्न शोधण्यासाठी काही कुटुंब बाहेर पडले त्यांना उत्तर प्रदेशात चोर समजून काही लोकांनी हत्या केली. असे प्रकार वाढले तर रस्त्यारस्त्यावर खून पडतील. पालघर घटनेबाबत विरोधकांनी टीका केली. राज्यातील विरोधी पक्षाने वर्षा बंगल्यावर पोहचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधायला हवा. त्यांच्या काही सूचना असतील त्या चर्चा कराव्यात, विरोधी पक्षनेते नागपुरात बसले तरी तेथील कोरोना संक्रमण थांबेल असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
त्याचसोबत प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदत करत आहे. परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेन पाठवावी असं पत्र दिलं त्यात गैर नाही, अडकलेल्या लोकांची मदत करणं राज्य सरकारची जबाबदारी आहे. ज्या राज्यातील मजूर अडकलेले त्यांना घेऊन जाण्याची व्यवस्था व्हायला हवी होती. राजस्थान, हरिद्वार, गुजरातमधून लोक आणण्याची परवानगी मिळते मग महाराष्ट्रातून लोकांना घेऊन जाण्यास परवानगी नाही हे आश्चर्य आहे असंही राऊत म्हणाले.
..मग भारताने चीनच्या भानगडीत का पडायचे?
सध्या कोरोनाविरुद्ध जागतिक युद्ध सुरु आहे, या युद्धाचं केंद्रबिंदू निश्चित चीन आहे, याचठिकाणाहून या फौजा जगातील इतर देशांमध्ये पसरल्या आहेत. या चीनशी कोणताही व्यवहार करु नये अशी जनभावना आहे. मोदी आणि ट्रम्प यांचे फार चांगले संबंध आहे. हा चीन व्हायरसचं आहे, चीनशी व्यवहार करताना जपून वागलं पाहिजे. चीनसारखीच किट्स एका राज्याने साऊथ कोरियातून घेतले तेही कमी दरात घेतले आहे. केंद्र सरकारने राज्यांवर निर्बंध न लावता त्यांना सूट दिली पाहिजे. जाणीवपूर्वक जनतेच्या जीवाशी कोणी खेळणार नाही, इटली, पाकिस्तान, नेपाळ या मित्रपक्षांनाही चीनने फसवलं मग भारताने चीनच्या भानगडीत का पडायचं? हा साधा प्रश्न उपस्थित होतो असं संजय राऊतांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
‘कोरोना युद्ध काळात नरेंद्र मोदी सरकारने ‘इतकी’ मोठी गफलत कशी केली?’
देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र शिजतंय; संजय राऊत यांचा मोठा दावा, म्हणाले...
जागतिक आरोग्य तज्ज्ञांचा इशारा; भारताने लॉकडाऊन हटवण्याची घाई करु नये, अन्यथा...
कर्मचाऱ्यांना ४ महिने विना पगार रजेवर पाठवणार; हॉटेल उद्योगातील ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय