coronavirus: 'गरजू रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सज्ज, तात्काळ रक्तपुरवठा होणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 05:25 PM2020-03-26T17:25:42+5:302020-03-26T17:30:12+5:30

खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना करणार थेट मदत, तर गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा

coronavirus: 'Shiv Sena medical help room ready, immediate blood supply to help needy patients', says eknath shinde | coronavirus: 'गरजू रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सज्ज, तात्काळ रक्तपुरवठा होणार'

coronavirus: 'गरजू रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सज्ज, तात्काळ रक्तपुरवठा होणार'

googlenewsNext
ठळक मुद्देआपत्कालीन मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या  हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्याचे मार्गदर्शक एकनाथजी शिंदे यांचे आवाहन

मुंबई / ठाणे  - कोरोनाचा पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत लॉक डाउन असल्याने मुंबई-ठाण्यात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची मदत करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची टीम सज्ज असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिली. गरजू रुग्णांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाद्वारे सुरू केलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

कॅन्सर, ब्रेन टुयमर, किडणी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, कॉकलियर इंप्लांट आदि नियोजित शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्यातील अनेक रुग्ण मुंबईत येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यातील डिस्चार्ज मिळालेल्या अनेक रुग्णांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी तसेच आवश्यक औषधोपचार मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणीच्या काळात गरजू रुग्णांना गावी परतण्यासाठी वाहन व्यवस्था किंवा प्रसंगी मुंबईतील संत गाडगेबाबा धर्मशाळांमध्ये राहण्याची आणि जेवणाचीदेखील व्यवस्था करण्यात येणार आहे. खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा करण्यासाठी मदत केली जाणार आहे. तरी, गरजू रुग्णांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनचे विश्वस्त अभिजित दरेकर यांनी केले आहे. 

हेल्पलाईन नंबर - 
022 - 25322525 / 67 
( मंगेश चिवटे, कक्ष प्रमुख ) 
8907776002 
( माऊली धुळगंडे, वैद्यकीय सहाय्यक ) 
9423902525 
( निलेश देशमुख, वैद्यकीय सहाय्यक )
8275903030 
( स्वरूप काकडे, वैद्यकीय सहाय्यक) 
पत्ता- 1 
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ,
मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय. 
मंगला हायस्कुल समोर, कोपरी, ठाणे ( पूर्व ) 
पत्ता - 2 
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, 
शिवसेना भवन, तळमजला, दादर ( पश्चिम )
 

Web Title: coronavirus: 'Shiv Sena medical help room ready, immediate blood supply to help needy patients', says eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.