Coronavirus: धक्कादायक! वरळी कोळीवाड्यात पसरली कोरोनाची लागण; ४ रुग्ण आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 01:07 PM2020-03-30T13:07:53+5:302020-03-30T14:25:54+5:30

या रुग्णांपैकी कोणतीही परदेश दौरा केला नव्हता अथवा कोणत्याही कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आले नव्हते. तरीही या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

Coronavirus: Shocking! Corona infection spreads in Worli Koliwada; Four new cases have been reported pnm | Coronavirus: धक्कादायक! वरळी कोळीवाड्यात पसरली कोरोनाची लागण; ४ रुग्ण आढळल्याने खळबळ

Coronavirus: धक्कादायक! वरळी कोळीवाड्यात पसरली कोरोनाची लागण; ४ रुग्ण आढळल्याने खळबळ

Next
ठळक मुद्देकोणताही परदेश दौरा अथवा संपर्क नसतानाही कोरोनाची लागणमुंबईत मच्छिमार कॉलनीत कोरोनाचा शिरकाव पोलिसांकडून वरळी कोळीवाडा परिसर सील

मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यानंतर हळूहळू कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. अशातच कोरोना व्हायरसचा शिरकाव मुंबईतील मच्छिमारांच्या परिसरात झाला आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे ४ नवे रुग्ण आढळले आहेत.

या रुग्णांपैकी कोणतीही परदेश दौरा केला नव्हता अथवा कोणत्याही कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आले नव्हते. तरीही या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या चारही रुग्णांचे वय ५० च्या वर आहे. यातील एक रुग्ण ट्रॉम्बेमधील पीएसयूमध्ये स्वयंपाकाचे काम करत असे. त्यामुळे आम्ही त्यांच्या कर्मचार्‍यांची चाचणी व तपासणी करुन घेण्यास सांगितलं असल्याचं महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले. तसेच इतर तिघेही स्थानिक नोकर्‍या करतात आणि जास्त प्रवास करत नाहीत. त्यांना कुणामुळे संसर्ग झालाय सांगता येत नाही असं ते म्हणाले.

लॉकडाऊन आणि सोशल डिस्टेंसिंगचं लोकांकडून गांभीर्याने पालन होत नसल्याने महापालिका चिंतेत आहे. लॉकडाऊनचं आणखी कठोरपणे अंमलबजावणी करु. वारंवार लोकांना सूचना देऊनही लोक पालन करत नाहीत. अद्यापही लोक घराबाहेर पडत आहे. आम्ही कोळीवाड्यात यापूर्वीच निर्जंतुकीकरण मोहीम राबवली आहे. पण लोकांनी लॉकडाऊन पाळायला हवा अन्यथा व्हायरसचं सक्रमण जलदगतीने होईल असं शरद उघडे यांनी सांगितले. पोलिसांनी सध्या वरळी कोळीवाडा सील केला आहे. चहूबाजूंनी बॅरिकेडींग, पोलीसांचा बंदोबस्त लावला आहे, वरिष्ठ पोलीस अधिकारी जातीनं हजर आहेत. पालिका कर्मचा-यांकडनं संपूर्ण परिसराचं सॅनिटायझेशन सुरू केलं आहे तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कॉलनीमध्ये दुमजली इमारती आहेत. अनेक जण सामुहिक शौचालयाचा वापर करतात. यातील बहुतेक मच्छिमार आहेत ते याचठिकाणी राहतात आणि काम करतात. काही दिवसांपूर्वी प्रभादेवी येथे 65 वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. शुक्रवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. या बाईचाही कोणताही परदेश दौरा नव्हता किंवा तिचा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाशीही संबंध नव्हता असं असतानाही ही घटना घडली. ती महिला मेस चालवत होती त्यामुळे या खानावळीत जेवण करणाऱ्यांचा शोध घेणे महापालिकेपुढे मोठं आव्हान आहे.

महापालिकेने तिच्या ९ नातेवाईकांसह आजूबाजूच्या ३३ घरांमधील लोकांच्या चाचणी घेतल्या आहेत. तिच्या आसपास १८० रहिवाशांच्या चाचणीचा अहवालाची प्रतिक्षा करत आहेत. त्यामुळे झोपडपट्टी आणि घनदाट रहिवाशी परिसरात कोरोना पसरल्यास ते अधिक धोकादायक होऊ शकते असं महापालिकेने सांगितले आहे.

Web Title: Coronavirus: Shocking! Corona infection spreads in Worli Koliwada; Four new cases have been reported pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.