मुंबई : ‘कोरोना व्हायरससे बचने की रोग प्रतिरोधक दवाईयां उपलब्ध’ म्हणत शीतल आयुर्वेद भंडारने परिपत्रक काढले. अवघ्या १५० रुपयांत आयुर्वेदिक गोळ्या विक्रीसाठी ठेवल्याची धक्कादायक माहिती एफडीएच्या कारवाईतून समोर आली. एफडीएने मुलुंड येथील शाखेवर सोमवारी छापा टाकून गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. शीतल हर्बल कंपनीचे मुलुंड, घाटकोपर, विलेपार्ले आणि कांदिवली या ठिकाणी ही केंद्रे आहेत. या केंद्रांत कोरोना रोगप्रतिकार औषधे उपलब्ध असल्याची जाहिरात केली. या जाहिरातीची पत्रके घरोघरी पोहोचवून औषधांची विक्रीही सुरू केली. एका तरुणाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
धक्कादायक! कोरोनासाठी आयुर्वेदिक गोळ्यांची विक्री, एफडीएची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 5:41 AM