Join us

Coronavirus : सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा 'रक्त संकलनाचा संकल्प'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:39 PM

Coronavirus : मुंबईमध्ये राहाणाऱ्या ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी आपले नाव सिद्धिविनायक गणपती मंदिरात दुरध्वनीद्वारे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नोंदवावे.

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वतीने रक्तदानाबाबत करण्यात आलेल्या आवाहनानुसार रक्ताचा तुटवडा लक्षात घेता श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने रक्त संकलन करण्याचा संकल्प  करण्यात आला आहे. मुंबईमध्ये राहाणाऱ्या ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी आपले नाव सिद्धिविनायक गणपती मंदिरात022-24224438, 022-24223206 दुरध्वनीद्वारे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नोंदवावे.

रक्तदात्याच्या राहत्या घराच्या जवळ, थेट सोसायटीच्या आवारात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची रक्त संकलन व्हॅन पोहचेल. त्यामुळे रक्तदात्याना राहत्या ठिकाणी रक्तदान करता येईल. कृपया गर्दी न करता रक्तदान करावे आणि रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य करावे असं आवाहन सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाचा गुगल, फेसबुकला फटका; तब्बल 4400 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता

Coronavirus: देशासाठी सदैव तत्पर! कोरोनाग्रस्तांसाठी CRPF चा पुढाकार, 33 कोटी 81 लाखांची केली मदत

Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव, कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर

Coronavirus : भारताचे 'मिशन कोरोना'; 'या' राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठं रुग्णालय

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईसिद्धिविनायक गणपती मंदिरआदेश बांदेकर