coronavirus : साहेब... आम्हाला विसरलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:22 AM2020-04-28T05:22:08+5:302020-04-28T05:23:01+5:30

वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने साहेब आम्हाला विसरलात का? असा सवाल ते करीत आहेत.

coronavirus : Sir ... have you forgotten us?, Question of locked down prison staff | coronavirus : साहेब... आम्हाला विसरलात का?

coronavirus : साहेब... आम्हाला विसरलात का?

googlenewsNext

मनीषा म्हात्रे 
मुंबई : घरी लहान बाळ... वृद्ध आई वडील... तर कुठे नवीनच थाटलेला संसार... अशातच कोरोनाचा प्रकोप होऊन कारागृह लॉकडाउनचे आदेश निघाले आणि हा आलोच, बोलून घराबाहेर पडलेले पोलीस ‘बंदिवासा’त अडकले. आज-उद्या मोकळा श्वास घेता येईल या भाबडया आशेपोटी चार भिंतीआड अडकलेल्या कर्मचाऱ्यांनी १५ दिवस कैद्यांसोबत काढले आहेत. वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने साहेब आम्हाला विसरलात का? असा सवाल ते करीत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील कारागृहे तातडीने लॉकडाउन करण्याचा निर्णय ९ तारखेला शासनाने घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या निर्णयानुसार राज्यातील मुंबई, ठाणे, येरवडा येथील मध्यवर्ती कारागृह, भायखळा व कल्याण ही जिल्हा कारागृहे लॉकडाउन करण्यास सांगितले. यात अधीक्षकासह ४० ते ५० कर्मचारी कारागृहाच्या चार भिंतीआड आहेत. आम्ही पोलीस हाच गुन्हा की काय ? अशीही प्रतिक्रिया आपल्या चिमुकल्याला घरी सोडून येथे कार्यरत महिला पोलिसाने दिली.
मोबाइल नाही. त्यामुळे सरकारी क्रमांकावरुनच कुटुंबाशी संपर्क साधतो. दाटीवाटीने झोपत असल्याने सोशल डिस्टन्सिंग नाहीच, असे एका पोलिसाने नमूद केले. बहुतांश कर्मचारी तरुण आहेत. वृद्ध आई-वडील, लहान मूल यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशात प्रशासनाची भूमिका अस्वस्थ करणारी असल्याची प्रतिक्रिया येथे कार्यरत पोलिसांनी दिली. 

गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी
बाहेरचा कोणी आत आलाच नाही तर कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही म्हणत अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी आतील कर्मचाऱ्यांना आतमध्येच ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र ते किती दिवस आणि कसे याबाबत काहीही पावले उचलण्यात येत नसल्याचे अन्य कारागृह अधिकाºयाने सांगितले. त्यामुळे गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणीही कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

Web Title: coronavirus : Sir ... have you forgotten us?, Question of locked down prison staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.