मुंबई : मिशन धारावीच्या माध्यमातून चांगला बदल आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये आता दिसून येत आहे. मुंबईतील हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या धारावीत आता ५० दिवसांनी रुग्ण दुप्पट होत आहेत. तसेच रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण याच विभागात आहे. गेल्या आठवड्यापासून मृतांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत येथील मृत्यूदर आता कमी आहे. महापालिकेसमोर सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या या सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात आला आहे. मिशन धारावी, क्लिनिक फिव्हरच्या माध्यमातून धारावीतील सुमारे सात लाख लोकांची तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण, जास्तीत जास्त लोकांची चाचणी, तात्काळ निदान व उपचार, प्रतिबंधित क्षेत्रात अन्नवाटप, विनामूल्य वैद्यकीय सेवा अशा उपाययोजनांमुळे धारावी कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे.असे मिळवले कोरोनावर नियंत्रणधारावीत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडला. अडीच चौ.कि.मी. जागेत साडेआठ लाख लोकवस्ती असल्यामुळे येथे सोशल डिस्टन्सिंग अशक्य होते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून संशयितांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवणे यावर भर देण्यात आला. मिशन धारावी आणि फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून तसेच खासगी डॉक्टर्सच्या मदतीने संपूर्ण विभाग पिंजून काढण्यात आला. आतापर्यंत ८५०० लोकांना संस्थात्मक केंद्रात तर ३८ हजार लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर सात हजार लोकांची चाचणी करण्यात आली आहे. डॉक्टरपासून अभियंत्यापर्यंत पालिकेचे २७५० तर कंत्राटी १२५० मनुष्यबळ या विभागात काम करीत आहे. रुग्णांपर्यंत तात्काळ पोहोचणे, योग्य उपचार आणि त्वरित डिस्चार्ज हे सूत्र येथे यशस्वी ठरत आहे.जून महिन्यात कोरोनाचे सात बळी३० मेपासून ८ जूनपर्यंत कोरोनामुळे धारावीत एकाही रुग्णाचा बळी गेला नाही. मात्र ९,११,१२ जून या तीन दिवसात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बुधवारी आणखीन एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीत गेल्या १७ दिवसांत कोरोनाचे सात बळी गेले आहेत.धारावीमध्ये मृत्यूदर महिना मृत्यू प्रमाणएप्रिल पाच टक्केमे चार टक्केजून ३.७ टक्के१७ जूनची कोरोना आकडेवारी विभाग एकूण रुग्ण डिस्चार्जधारावी २१०६ १०५३दादर ५८७ २४४माहीम ८३९ ३५०
CoronaVirus News: धारावीची प्रकृती सुधारतेय; रुग्ण दुपटीचे प्रमाण ५० दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 2:04 AM