मुंबई : मुंबई पालिकेच्या नायर व केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला. या रुग्णालयांत चाचणीसाठी १०१ स्वयंसेवक सहभागी झाले. मात्र, केईएम रुग्णालयातील सहा स्वयंसेवकांनी माघार घेतली आहे. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ते रुग्णालयात उपस्थित राहिले नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.सहा स्वयंसेवक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आले नाहीत. कदाचित, लसीकरणाविषयी भीती किंवा चिंता हे कारण असू शकते. मात्र, स्वत:च्या मर्जीने ते सहभागी झाले होते, तसेच चाचणीतून बाहेर पडण्याचा हक्क त्यांना आहे, अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली.कोणावरही दुष्परिणाम नाहीनायर रुग्णालयात १४८ स्वयंसेवकांना लसीचा डोस देण्यात आला. कोणालाही दुष्परिणाम जाणवलेला नाही. शारीरिक, मानसिक पातळ्यांवर स्वयंसेवकांच्या स्वास्थ्याचे परीक्षण केले जात आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले, स्वयंसेवकांनी अर्ध्यावरून माघार घेणे दुर्दैवी आहे. यामुळे आता २५ अधिकचे स्वयंसेवक यात सहभागी करून घेतले जातील.
CoronaVirus News: कोरोना लसीच्या चाचणीतून सहा जणांची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 4:48 AM