Coronavirus: ... म्हणून राज्यात कोविड-19 च्या सर्व चाचण्या अन् उपचार मोफत, मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 09:12 AM2020-04-25T09:12:52+5:302020-04-25T09:36:30+5:30

जागतिक आरोग्य संघटने कडून कोविड-19 प्रादुर्भावास पंडेमिक घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे

Coronavirus: ... so all tests and treatment of Covid-19 in the state are free, big decision | Coronavirus: ... म्हणून राज्यात कोविड-19 च्या सर्व चाचण्या अन् उपचार मोफत, मोठा दिलासा

Coronavirus: ... म्हणून राज्यात कोविड-19 च्या सर्व चाचण्या अन् उपचार मोफत, मोठा दिलासा

googlenewsNext

लातूर - कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये या संदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार  निशुल्क  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण  व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे कोरोना आणि आर्थिक महामारीच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनावरील उपचारासाठी येणाऱ्या खर्चामुळेही अनेक नागरिक तपासणीसाठी पुढे येत नव्हते, आता ही चिंता दूर  होणार आहे.  

जागतिक आरोग्य संघटने कडून कोविड-19 प्रादुर्भावास पंडेमिक घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोविड-19 संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे निशुल्क करण्यात आले आहेत. कोविड -19 ग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात, असा अनुभव आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील. त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने कोविड-19 ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल  असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.


 

Web Title: Coronavirus: ... so all tests and treatment of Covid-19 in the state are free, big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.