मुंबई – राज्यात कोरोनाचे १६५२ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ९५० च्या दरम्यान मुंबईत रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी १५ दिवस वाढवले आहेत. पण हे सांगताना त्यांनी किमान या शब्दावर जोर दिला आहे. त्यामुळे आपल्याला शिस्त पाळलीच पाहिजे अन्यथा पुढे लॉकडाऊन वाढवण्याची गरज भासल्याशिवाय राहणार नाही असे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधानांनी सांगितलेल्या सूचनेत एक गाईड लाईन दिली जाणार आहे. ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशाप्रकारे तीन कॅटेगिरी तयार करण्यात येणार आहे. १५ पेक्षा जास्त रुग्ण आहेत त्याला रेड झोन, १५ पेक्षा कमी रुग्ण असणारे जिल्हे ऑरेज झोनमध्ये असतील तर एकही रुग्ण नाही याठिकाणी ग्रीन झोन लावण्यात येणार आहे. यामध्ये ग्रीन झोनमध्ये जिल्ह्याच्या सीमाबंद करुन त्याअंतर्गत कामकाज सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाईल. अशाप्रकारे गाईडलाईन एक-दोन दिवसांत केंद्राकडून येतील असं त्यांनी सांगितले.
तसेच ग्रीन झोनमधील कंपन्यांमध्येही सोशल डिस्टेंसिंग पालन करणार असतील तर त्या उद्योगांना काम सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेण्यात येतील. एपीएमसी कायद्यात बदल करुन जर शेतकऱ्यांना थेट माल बाजारात नेता येईल का हादेखील विचार करण्यात आला आहे. या सर्व मार्गदर्शक सूचना ग्राह्य धरून पुढील कारवाई करतील. मुंबई, पुणे, महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये राहतील. ग्रामीण भागात कठोर लॉकडाऊनचं अंमलबजावणी झाली त्याचं कौतुक पंतप्रधानांनी केलं आहे. शहरी भागातही लॉकडाऊन तंतोतंत पाळलं पाहिजे, मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार याच ब्रीदवाक्याने जनतेने काम करावं असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात आली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय वर्गवारी केली आहे.
मुंबईतील सेव्हन हिल पॉस्पीटलमध्ये ३०० खाटा अत्यवस्थ रुग्णांसाठी असून या रुग्णालयात कोरोना तिनही वर्गवारीच्या रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी उपयुक्त असलेले आरोग्यसेतु ॲप महाराष्ट्र लागू करण्याबाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे.
सर्व जिल्ह्यांमध्ये टेलिमेडिसीनच्या माध्यमातून रुग्णांना तज्ञांच्या मदतीने आरोग्य सल्ला व उपचार केले जाऊ शकतील.
राज्यातील पॅरोमेडिकल कर्मचारी आहेत त्यांना वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना चाचण्यांबाबत पूल टेस्टिंग ही नविन संकल्पना आज महाराष्ट्राने पंतप्रधानांसमोर मांडली. त्याद्वारे वेळेची आणि किटची बचत होण्यास मदत होईल.
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
'आर्थिक आणीबाणी'चा झटका मोदी देशाला देणार?
जान भी है और जहान भी'; संकटकाळात भारतीयांना मोदींचा दिलासा
अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मौन सोडलं; नाव न घेता भाजपा नेत्यांचा घेतला समाचार
PM मोदींचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय योग्यच; केजरीवालांनी केलं कौतुक