coronavirus: लस चाचणीच्या प्रयोगाकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 01:52 AM2020-09-04T01:52:07+5:302020-09-04T01:52:33+5:30
रुग्णालयात या चाचणीकरिता अधिक व्यक्तींची गरज आहे. यासाठी चाचणीत सहभाग घेणारी त्या व्यक्तीच्या शरीरात कोविडविरोधात प्रतिपिंडे नसायला हवीत. शिवाय, यात रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना सहभागी होऊ न देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता लसीच्या प्रयोगाकरिता सर्वसामान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात मुंबईत नायर आणि केईएम रुग्णालयांत ३०० हून अधिक व्यक्तींनी कोविशिल्ड लसीच्या प्रयोगाकरिता नोंद केली आहे. केईएम रुग्णालयात २७८ व्यक्तींनी तर नायर रुग्णालयात ४० हून अधिक व्यक्तींनी नोंदणी केली आहे. नायर रुग्णालयात जवळपास ४०० व्यक्तींनी संपर्क साधून लसीच्या प्रयोगाकरिता चौकशी केली आहे.
नायरचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी याविषयी सांगितले की, रुग्णालयात या चाचणीकरिता अधिक व्यक्तींची गरज आहे. यासाठी चाचणीत सहभाग घेणारी त्या व्यक्तीच्या शरीरात कोविडविरोधात प्रतिपिंडे नसायला हवीत. शिवाय, यात रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना सहभागी होऊ न देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.