Coronavirus : लॉकडाऊनमुळे दहावी-बारावीच्या निकालांना लागणार लेटमार्क
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 03:56 PM2020-03-26T15:56:28+5:302020-03-26T15:59:50+5:30
Coronavirus : संचारबंदीमुळे शिक्षकांना प्रवास करणे अवघड झाल्याने आता जवळपास सर्वच विषयाच्या उत्तरपत्रिका या शाळेत , केंद्रावर अडकून पडल्या आहेत.
मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने सगळ्यांनाच वर्क फ्रॉम होमचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. अशात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनही शिक्षकांना दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका घरी तपासण्याचे निर्देश अटी शर्ती घालून देण्यात आले आहेत. मात्र आधीच संचारबंदी आणि त्यात लॉकडाऊन लागू झाल्याने 10 वी च्या जवळपास लाखो उत्तरपत्रिका या शाळेमध्ये अडकून पडल्या आहेत. शिक्षकांना पेपर कलेक्शनसाठी पर्यायच उपलब्ध राहिला नाही, त्यात आधीच काही शिक्षक गावी पोहचले आहेत. या परिस्थितीत जोपर्यंत संचार बंदी उठून शिक्षक हे पेपर्स येऊन गोळा करणार नाहीत व तोपर्यंत निकाल लागणे शक्य नाही. त्यामुळे निश्चितच यंदा दहावी-बारावीच्या निकालाना लेटमार्क लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.
नियमानुसार दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणे अपेक्षित असते मात्र आता शिक्षकांना पेपर तपासण्यासाठी विलंब होणार असून शिक्षकांनी हे पेपर तपासल्यानंतर नियामककडे (मॉडरेटर) जातात आणि त्यानंतर गुणपत्रक तयार केले जातात. मग निकाल लागतो अशी प्रक्रिया असल्याने निकालाला लेटमार्क लागणे निश्चित असल्याचे मत एका शिक्षकाने व्यक्त केले.
Coronavirus : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकार थेट खात्यात PF जमा करणारhttps://t.co/72uXgBDDrn#coronavirusindia#NirmalaSitharaman#EPFO
— Lokmat (@MiLOKMAT) March 26, 2020
वेळापत्रकानुसार 1 मार्च ते 23 मार्च पर्यंत दहावीची परीक्षा नियोजित होती. मात्र, आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 23 मार्चला रोजी होणारा दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकल्याने हा पेपर संचारबंदी मागे घेतल्यानंतर त्याबाबतची तारीख सांगितली जाणार आहे. राज्यात कोरोनाचा वाढत प्रदूर्भाव लक्षात घेता शिक्षक संघटनांनी दहावीच्या उत्तरपत्रिका या आधी घरी देण्यात याव्यात आणि वर्क फ्रॉम होमद्वारे या उत्तरपत्रिका तपासण्याचे शिक्षकांना आदेश द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती.
मात्र संचारबंदीमुळे शिक्षकांना प्रवास करणे अवघड झाल्याने आता जवळपास सर्वच विषयाच्या उत्तरपत्रिका या शाळेत , केंद्रावर अडकून पडल्या आहेत. जर या उत्तरपत्रिका आधीच शिक्षकांना पुढच्या परिस्थितीचा विचार करुन घरी तपासण्यासाठीचा नियोजन केले असते तर या प्रश्नपत्रिका तपासण्याचे काम शिक्षक घरी करू शकले असते आणि हा गोंधळ निर्माण झाला नसता, अशी प्रतिक्रिया अंधेरीच्या हंसराज मोररारजी हायस्कुलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षण मंडळ आणि शालेय शिक्षण विभाग राहिलेला दहावीचा भूगोलाचा पेपर आणि निकालाचे व्यवस्थापन यांचे नियोजन येत्या काळात कसे करणार आणि यातून मार्ग काढण्यासाठी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
#IndiaFightsCorona गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज, निर्मला सीतारामन यांची घोषणा..
— Lokmat (@MiLOKMAT) March 26, 2020
संपूर्ण बातमीसाठी क्लिक करा- https://t.co/4jx4O0DJlmpic.twitter.com/YUHKogvoGC
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकार थेट खात्यात PF जमा करणार
Coronavirus : जगाला कोरोनाचा विळखा! तब्बल 3 अब्ज नागरिक लॉकडाऊन, 21,300 जणांचा मृत्यू
Coronavirus : स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठी खूशखबर! घरबसल्या मिळणार ‘ही’ सुविधा
Coronavirus : डॉक्टरलाच झाली कोरोनाची लागण, 1000 रुग्णांना संसर्गाचा धोका
Coronavirus : बापरे! फक्त 20 मिनिटांत एका व्यक्तीमुळे 4 जणांना कोरोनाची लागण