Join us

Coronavirus: एसटी महामंडळाचे कर्मचारी दुर्लक्षित;  अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 2:56 AM

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या विभागांतून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी बस धावत आहेत

मुंबई : अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाऱ्यांची ने-आण एसटी महामंडळ करत आहे. अत्यावश्यक सेवा देत असताना कुर्ला नेहरूनगर येथील कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली. या कर्मचाºयाच्या संपर्कात आलेल्या इतर सहा जणांची तपासणी करण्याऐवजी त्यांना घरी जाण्यास सांगून दुसºया दिवशी या कर्मचाºयांना क्वारंटाइन केले. त्यामुळे एसटी महामंडळ कर्मचाºयांच्या बाबतीत दुर्लक्ष करत असल्याचे एसटी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.

एसटी महामंडळातील कुर्ला नेहरूनगरमधील यांत्रिक कर्मचाºयांला १ मे रोजी कोरोनाची लागण झाली. यावेळी हा कर्मचारी घाटकोपर येथील रुग्णालयात दाखल झाला. मात्र या कर्मचाºयाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांची तपासणी करण्याऐवजी त्यांना घरी पाठविले. त्यामुळे या सहा जणांच्या संपर्कात येणाºया नागरिकांना कोरोना होण्याची भीती आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघंटनांनी आक्षेप घेत, या सहा जणांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र संबंधित आगार व्यवस्थापक आणि एसटी महामंडळ कर्मचाºयांच्या आरोग्याशी खेळत आहे, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचारी संघटनेने दिली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या विभागांतून अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांसाठी एसटी बस धावत आहेत. मात्र या कर्मचाºयांना योग्य मास्क, हातमोजे, सॅनिटायझर दिले गेले नाही. रेस्ट रूम स्वच्छ केली जात नाही. बस आणि आगार परिसर निर्जंतुकीकरण केले जात नाही, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचारी संघटनेने दिली.परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन एसटीच्या अधिकाºयांनी केले पाहिजे. एसटी महामंडळ कर्मचाºयांकडून फक्त कामे करून घेत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी महामंडळ घेत नाही. रेस्ट रूम, बस निर्जंतुकीकरण केल्या पाहिजेत. कर्मचाºयांना कामाची जबाबदारी देताना त्यांना आरामही मिळेल, याची खबरदारी घेतली पाहिजे. वाहक, चालकांना मास्क, हातमोजे दिले पाहिजेत. - हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेनाकोरोना लागण झालेल्या कर्मचाºयाच्या भावाचे लग्न होते. मात्र आता हे लग्न पुढे ढकलले आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना लागण झालेल्या कर्मचाºयांसह इतर सहा कर्मचाºयांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. एसटी महामंडळ आणि संबंधित अधिकारी वर्ग कर्मचाºयांच्या जीवाशी खेळत आहे. संबंधित प्रकरणात चौकशी करून कारवाई करावी. कर्मचाºयांच्या राहण्याची, जेवणाची योग्य सोय केली नाही. उरण, पनवेल येथील कर्मचाºयांना मास्क दिले नाहीत. गाड्या व परिसर निर्जंतुकीकरण करून मिळावेत, ५० लाखांचे विमा कवच मिळावे. - मुकेश तिगोटे, सरचिटणीस एसटी कामगार काँग्रेस (इंटक)

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या