CoronaVirus News: सलून, पार्लरबद्दलची 'ती' अधिसूचना राज्य सरकारनं काढलेली नाही; DGIPRचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:09 PM2020-05-27T23:09:24+5:302020-05-27T23:09:47+5:30
व्हायरल मेसेजवर डीजीआयपीआरचा खुलासा
Next
मुंबई: राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर्स २९ मेपासून सुरू होणार नसल्याचा खुलासा डीजीआयपीआरनं केला आहे. ठाकरे सरकारनं सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं मेसेज व्हायरल झाला होता. मात्र डीजीआयपीनं याबद्दलचा खुलासा करत तशी कोणतीही सूचना राज्य सरकारनं काढली नसल्याचं स्पष्ट केलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या अधिसूचना राज्य शासनाने जारी केलेल्या नाहीत.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 27, 2020
It is observed that above copies of ‘notifications’ are in circulation in social media. The State Govt clarifies that these notifications are not issued by the Govt of #Maharashtra. pic.twitter.com/OqpA4VBtw4
राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. परवापासून म्हणजेच २९ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे, असा एक मेसेज अधिसूचनेसह सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर्स सुरू करताना पाळाव्या लागणाऱ्या नियमांचादेखील उल्लेख होता. मात्र त्या मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं डीजीआयपीआरनं म्हटलं आहे. तसं ट्विटदेखील डीजीआयपीआरकडून करण्यात आलं आहे.