Join us

CoronaVirus News: सलून, पार्लरबद्दलची 'ती' अधिसूचना राज्य सरकारनं काढलेली नाही; DGIPRचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:09 PM

व्हायरल मेसेजवर डीजीआयपीआरचा खुलासा

मुंबई: राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर्स २९ मेपासून सुरू होणार नसल्याचा खुलासा डीजीआयपीआरनं केला आहे. ठाकरे सरकारनं सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं मेसेज व्हायरल झाला होता. मात्र डीजीआयपीनं याबद्दलचा खुलासा करत तशी कोणतीही सूचना राज्य सरकारनं काढली नसल्याचं स्पष्ट केलं. राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. परवापासून म्हणजेच २९ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे, असा एक मेसेज अधिसूचनेसह सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर्स सुरू करताना पाळाव्या लागणाऱ्या नियमांचादेखील उल्लेख होता. मात्र त्या मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं डीजीआयपीआरनं म्हटलं आहे. तसं ट्विटदेखील डीजीआयपीआरकडून करण्यात आलं आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस