Join us

CoronaVirus : राज्यात २४ हजारावर पोलिसांनी केली कोरोनावर मात तर २६ हजार कोरोनाबाधित 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 8:27 PM

CoronaVirus : २८२  पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

ठळक मुद्दे२२ मार्चपासून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पोलीस बंदोबस्ताच्या निमित्ताने रस्त्यावर तैनात होते.कोरोनामुक्त झालेल्यापैकी ८५ टक्के पोलीस पुन्हा आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी रुजू झाले आहेत, अशी माहिती गृह विभागाच्यावतीने देण्यात आली.

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, आरोग्य सेवकांच्या बरोबरीने प्रयत्नशील  असताना त्याची लागण झालेल्या राज्य पोलीस दलातील २४ हजार ३८३ अधिकारी, अंमलदारानी त्यावर मात केली आहे. तर २८२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

 

२२ मार्चपासून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पोलीस बंदोबस्ताच्या निमित्ताने रस्त्यावर तैनात होते. त्यावेळी कोरोनाग्रस्ताच्या  सानिध्यात आल्याने  राज्यभरातील २६ हजार २५४ पोलीस व अधिकाऱ्यांना त्याची लागण झाली. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने त्यापैकी २७ अधिकारी व २५५ अंमलदाराचा त्यामध्ये मृत्यू झाला. तर २४ हजार३८३ जण सुखरूपपणे बरे झाले. अद्यापही १८७१  अधिकारी व अंमलदार कोरोनाबधित असून त्यांच्यावर संबंधित कार्यक्षेत्राच्या हद्दीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनामुक्त झालेल्यापैकी ८५ टक्के पोलीस पुन्हा आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी रुजू झाले आहेत, अशी माहिती गृह विभागाच्यावतीने देण्यात आली.

टॅग्स :पोलिसकोरोना वायरस बातम्यामृत्यू