Join us

coronavirus: तसा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करणार, राज्य सरकारचा पतंजलीला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 3:59 PM

आता कोरोनिलवरून राज्य सरकारकडून पतंजलीला इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपतंजलीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधामुळे कोरोना बरा होत नाहीया औषधामुळे कोरोना बरा होत असल्याचा दावा या कंपनीने केल्यास तसेच याबाबत संभ्रम निर्माण करून लोकांची दिशाभूल केल्यास पतंजलीवर कारवाई करण्यात येईलराज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला इशारा

मुंबई - योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने आणलेले कोरोनिल हे औषध रोज नव्या वादात अडकत आहे. सुरुवातीला या औषधामुळे कोरोना बरा होत असल्याचा दावा करणाऱ्या पतंजलीने नंतर आपला दावा मागे घेत हे औषध केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर या औषधाच्या विक्रीस परवानगी मिळाली होती. मात्र आता कोरोनिलवरून राज्य सरकारकडून पतंजलीला इशारा देण्यात आला आहे.

बाबा रामदेव यांच्या पतंजलीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधामुळे कोरोना बरा होत नाही. मात्र या औषधामुळे कोरोना बरा होत असल्याचा दावा या कंपनीने केल्यास तसेच याबाबत संभ्रम निर्माण करून लोकांची दिशाभूल केल्यास पतंजलीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

पतंजलीने औषधाला दिलेले कोरोनिल हे नाव आणि प्रसारमाध्यमातून त्याचा सुरू असलेला प्रचार यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. या कोरोनिलचा वापर केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. त्याने कोरोना बरा होत नाही, असेही शिंगणे यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाने या औषधाला केवळ रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध म्हणून मान्यता दिली आहे. कोरोनावरील औषध म्हणून मान्यता दिलेली नाही, असेही शिंगे यांनी स्पष्ट केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ज्या वस्तूसाठी होता चीनवर 'निर्भर', त्याच्याच निर्मितीत भारत बनला 'आत्मनिर्भर', आता करणार निर्यात

हातात घेऊन कृपाण, गलवानमध्ये बारा चिन्यांचे केले शिरकाण; २३ वर्षांच्या जवानाचा महापराक्रम

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

चीनविरोधात सैन्य पाठवण्यामागे अमेरिकेचा हा आहे सुप्त हेतू, या ठिकाणांवरून परिस्थितीवर ठेवलीय नजर

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकारपतंजलीरामदेव बाबा