Join us

coronavirus: मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश, महापालिकेचा आता मिशन झीरोवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 3:43 AM

मुंबईत ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रु ग्ण आढळून आला. त्यानंतर उच्चभ्रू वस्तीपासून दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला.

मुंबई : चेसिंग दि व्हायरस मोहिमेद्वारे महापालिकेने हॉटस्पॉट पिंजून काढत कोरोना चाचणी सुरू ठेवली. याचे सकारात्मक परिणाम, मुंबईत दिसून येत आहेत. आतापर्यंत ६७ टक्के रु ग्ण कोरोनामुक्त झाले असून २३ हजार २३९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र अंधेरी, मालाड ते दहिसर, भांडुप - मुलुंड या विभागातील रुग्णवाढ चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे मिशन झीरोद्वारे या विभागांवर पालिकेने आता लक्ष केंद्रित केले आहे.मुंबईत ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रु ग्ण आढळून आला. त्यानंतर  उच्चभ्रू वस्तीपासून दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. मुंबईतील धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा प्रसार रोखणे पालिकेपुढे एक मोठे आव्हान ठरले. मात्र टेस्टिंग, ट्रॅकिंग, क्वारंटाइन आणि ट्रीटमेंट या सूत्राचा अवलंब महापालिकेने केला. वैद्यकीय  प्रयोगशाळांना २४ तासांच्या आत कोरोना रुग्णांचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर कोरोना उपचार केंद्र व रुग्णालये यांची क्षमता वाढविण्यात आली.कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २0 दिवसांवर नेण्यासाठी आठ सनदी अधिकाऱ्यांची टीम ८ मे रोजी स्थापन करण्यात आली. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी झोपडपट्ट्यांमध्ये राबविलेल्या चेसिंग दि व्हायरस या मोहिमेने आपला प्रभाव दाखवला. या टीमने केलेल्या उपाययोजनांना यश येत असल्याचे दिसत आहे. जास्तीतजास्त लोकांची चाचणी, प्रभावी क्वारंटाइन आणि योग्य उपचार यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. तसेच रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी आता ४३ दिवसांचा कालावधी लागत आहे. रुग्ण वाढण्याचे प्रमाण मुंबईतील सरासरीपेक्षा अधिकअसलेल्या उपनगरातील विभागांमध्ये आयुक्तांनी मिशन झीरो ही मोहीम सुरू केली आहे.कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २0 दिवसांवर नेण्यासाठी आठ सनदी अधिकाऱ्यांची टीम ८ मे रोजी स्थापन करण्यात आली. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी झोपडपट्ट्यांमध्ये राबविलेल्या चेसिंग दि व्हायरस या मोहिमेने आपला प्रभाव दाखवला.मुंबईत ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रु ग्ण आढळल्यानंतर उच्चभ्रू वस्तीपासून दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. मुंबईतील धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा प्रसार रोखणे पालिकेपुढे एक मोठे आव्हान ठरले.भांडुप, मुलुंड, मालाड, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, कांदिवली, दहिसर, ग्रँट रोड, माहिम या भागांमध्ये गेल्या काही दिवसांत बाधित रु ग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.पश्चिम उपनगरामध्ये मालाड ते दहिसर, मुलुंड, भांडुप येथे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मिशन झीरो सुरू करण्यात आले आहे.जुलैपर्यंत पूर्णपणे नियंत्रणमहापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये वॉर्ड वॉर रूम तयार केल्याने आता पालिका स्वत: पॉझिटिव्ह रु ग्णांपर्यंत पोहोचते, त्यांच्याशी संपर्क आणि सुसंवाद साधून सर्व समस्यांचे निराकरण करीत आहे. याच पद्धतीने कामगिरी होत राहिली तर जुलै मध्यापर्यंत मुंबईतील कोविड संसर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रणात असेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई