CoronaVirus सेव्हन हिल्सच्या ज्येष्ठ डॉक्टरमध्ये लक्षणे; जसलोकमधील सात नर्स पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 09:30 PM2020-04-01T21:30:39+5:302020-04-01T21:31:20+5:30

CoronaVirus in mumbai कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या या डॉक्टरकडे मुंबईतील पालिकेच्या एका रुग्णालयाचे अधिष्ठातापदही आहे. त्यांना डायरियाचा त्रास सुरु झाला आणि ताप आला. त्यावेळेस, त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयातच अलगीकरण करुन सलाईन लावण्यात आले.

CoronaVirus Symptoms in Seven Hills senior doctor; Seven nurses from Jaslok positive hrb | CoronaVirus सेव्हन हिल्सच्या ज्येष्ठ डॉक्टरमध्ये लक्षणे; जसलोकमधील सात नर्स पॉझिटिव्ह

CoronaVirus सेव्हन हिल्सच्या ज्येष्ठ डॉक्टरमध्ये लक्षणे; जसलोकमधील सात नर्स पॉझिटिव्ह

Next

मुंबई : दिवसागणिक मुंबईत कोरोनाची दहशत आणखीनच वाढली आहे. त्यात कोरोनाशी फ्रंटलाइनवर लढणाऱ्या डॉक्टर व आरोग्यसेविकांचाही जीव धोक्यात येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने  ४० डॉक्टर व आरोग्य सेवकांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. त्यातील मुंबईच्या प्रमुख रुग्णालयातील एका मोठ्या पदावर असणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरला कोरोनाची लक्षण दिसू लागली आहे, त्यामुळे त्यांना त्वरित अलगीकऱणास सांगितले आहे. या डॉक्टरकडे सेव्हन्स हिल्स रुग्णालयाच्या कोरोना केंद्राची प्रमुख जबाबदारी देण्यात आली होती. मुंबईत बुधवारी ३० कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे, तर सध्या शहर-उपनगरात एकूण १८१ कोरोना रुग्ण आहेत.


कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या या डॉक्टरकडे मुंबईतील पालिकेच्या एका रुग्णालयाचे अधिष्ठातापदही आहे. त्यांना डायरियाचा त्रास सुरु झाला आणि ताप आला. त्यावेळेस, त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयातच अलगीकरण करुन सलाईन लावण्यात आले. कोरोनाच्या चाचणीसाठी त्यांचा स्वॅब घेण्यात आला असून अहवाल प्रलंबित आहेत. कोरोनाच्या केंद्रात कार्यरत असल्यामुळे हे डॉक्टर गेले काही दिवस मरोळ येथील रुग्णालयाच्या गेस्टहाऊसमध्ये कुटुंबापासून वेगळे राहत होते. सध्या सेव्हन हिल्समध्ये १४५ जणांना संस्थात्मक अलगीकऱणासाठी दाखल कऱण्यात आले आहे. याखेरीज, आणखी धक्कादायक बाब म्हणजे, जसलोक रुग्णालयातील सात परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा निर्वाळा रुग्णालय प्रशासनाने दिला आहे. परिणामी, जसलोक रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग त्वरित बंद कऱण्यात आला असून परिचारिकांखेरीज या अनय कोरोना रुग्णांवरही येथे उपचार सुरु आहेत.


धारावीतही एक पॉझिटिव्ह
मुंबईतील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीतील ५६ वर्षांच्या पुरुषाला प्रवासाचा कोणताही इतिहास नसताना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या कुटुंबातील ७-८ सदस्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. सध्या हा रुग्ण सायन रुग्णालयात दाखल असून उपचार सुरु आहेत. मात्र प्रवासाचा इतिहास नसताना कोरोनाची लागण झाल्याने आता मुंबईपुढे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे नवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे
 

Web Title: CoronaVirus Symptoms in Seven Hills senior doctor; Seven nurses from Jaslok positive hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.