मुंबई : कोरोनाचा मुंबईला पडलेला विळखा अधिकाधिक घट्ट होऊ लागल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.मुंबई उपनगर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करावी, बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी यांचे निर्जंतुकीकरण करावे असे निर्देश आदित्य ठाकरे यांनी संबंधितांना दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, पालक सचिव अंशु सिन्हा, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाचे अधिकारी, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा.लि.चे अधिकारी, मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, प्रादेशिक परिवहन अधिकारी असे विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर म्हणाले, पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी संवाद साधला व विविध निर्देश दिले. मुंबई उपनगरातील किनारपट्टीवर नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. क्लब व गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात येणाºया रुग्णांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुरेशा सुविधा उपलब्ध राहतील याची काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिले आहेत.मुंबई उपनगर या जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यावर व त्यांची अंमलबजावणी करण्यावर आमचा भर असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी स्पष्ट केले.एस्सेल वर्ल्डमध्ये प्रवेश बंदविमानतळावरील प्रवाशांचा पहिला थेट संपर्क येत असलेल्या रिक्षा, टॅक्सीसहित उपनगरातील रिक्षा, टॅक्सी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणाºया बेस्ट बससहित इतर वाहनांचे निर्जंतुकीकरण सातत्याने व योग्यरीत्या व्हावे यासाठी काळजी घेण्याचे निर्देश आरटीओ व बेस्टच्या अधिकाºयांना देण्यात आले आहेत. एस्सेल वर्ल्डमध्ये प्रवेश बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याचीही माहिती बोरीकर यांनी दिली.
Coronavirus : उपाययोजना प्रभावीपणे करा - आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 3:34 AM