लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ( Marathi News ): राज्यात कोविड-१९ ची रुग्ण संख्या वाढत असल्याने टास्क फोर्सची पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. गंगाखेडकर यांनी कोविडच्या लाटेत आयसीएमआरच्या माध्यमातून देशाला मार्गदर्शन केले होते. एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचे थैमान सुरू झाले. त्यावेळी राज्य सरकारने डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला होता. टास्क फोर्स नेमणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य होते.
टास्क फोर्समध्ये कोण?
अध्यक्ष : डॉ रमण गंगाखेडकर, माजी प्रमुख, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद. सदस्य : लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक. संचालक : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, डॉ. सुरेश कार्यकर्ते, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख, बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे, डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे, डॉ. डी. बी. कदम, नवले मेडिकल कॉलेज, पुणे. आयुक्त : आरोग्य सेवा, सदस्य सचिव