coronavirus: टास्क फोर्सचे संजय ओक कोरोनामुक्त, पुन्हा होणार सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 07:45 AM2020-07-07T07:45:28+5:302020-07-07T07:46:18+5:30
गेले तीनहून अधिक महिने या टास्क फोर्सच्या माध्यमातून कोरोना निवारणासाठी अविरत झटणाऱ्या डॉ. ओक यांना गेल्या शनिवारी मुलुंड येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
Next
मुंबई : राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख असलेले डॉ. संजय ओक कोरोनामुक्त झाले असून त्यांना सोमवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. गेले तीनहून अधिक महिने या टास्क फोर्सच्या माध्यमातून कोरोना निवारणासाठी अविरत झटणाऱ्या डॉ. ओक यांना गेल्या शनिवारी मुलुंड येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
त्यांना सोमवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र पुढील१४ दिवस त्यांना विश्रांती घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा करोनाच्या लढाईत सक्रिय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना वेगाने पसरत असल्यामुळे राज्य सरकारने डॉ. ओक यांच्या अध्यक्षतेखाली सात डॉक्टरांच्या टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे.