Coronavirus: मुंबईत दहा हजारांवर बाधित; राज्यात १६,७५८; दिवसभरात ३४ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 06:44 AM2020-05-07T06:44:02+5:302020-05-07T06:44:15+5:30
राज्यात दिवसभरात सर्वाधिक १ हजार २३३ रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांत शासनाने नियम शिथिल केले असताना दुसरीकडे मात्र रुग्णसंख्येचा आलेख चढताच आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक १ हजार २३३ कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर ३४ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे रुग्णसंख्या १६ हजार ७५८, तर एकूण मृत्यू ६५१ एवढे झाले आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला असून रुग्णसंख्या १० हजार ७१४ झाली आहे. मुंबईत बुधवारी ७६९ रुग्णांचे निदान झाले असून २५ मृत्यूंची नोंद झाली. येथे आतापर्यंत ४१२ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत दिवसभरात ६८ कोरोना रुग्णांचे निदान, तर एका मृत्यूची नोंद झाली. येथील एकूण बाधितांचा आकडा ७३३वर पोहोचला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ३४ मृत्यूंमध्ये मुंबईतील २५, पुणे, अकोला प्रत्येकी तीन तसेच जळगाव शहर व सोलापुरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर उत्तर प्रदेशमधील एकाचा मुंबईत मृत्यू झाला.
दिवसभरात २७५ तर आजपर्यंत ३ हजार ९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत पाठवलेल्या १ लाख ९० हजार ८९७ नमुन्यांपैकी १ लाख ७३ हजार ८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या
१ हजार ४८ कंटेनमेंट झोन आहेत.