Join us

CoronaVirus :ठाकरे मंत्रिमंडळानं घेतले ४ महत्त्वाचे निर्णय, आता ५ रुपये दरानं शिवभोजन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 5:37 PM

लॉकडाऊन असल्यानं अनेकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या जात आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. 

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णांची संख्यासुद्धा काही केल्या कमी होण्याचं  नाव घेत नाहीये. देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. लॉकडाऊन असल्यानं अनेकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या जात आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच किराणा मालाच्या दुकानात चढ्या दरानं माल विकला जातोय, लोकांनाही पोटापाण्यासाठी त्या चढ्या दरानंच माल खरेदी करावा लागतो आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनच्या काळात गरिबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता केशरी शिधापत्रिका धारकांनाही स्वस्त दरात धान्य मिळणार आहे. ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं चार महत्त्वाचे निर्णय घेतले असून, जनतेला त्यातून दिलासा मिळणार आहे. ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील निर्णय 

1.      केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत.

2.      कोविडच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा.

3.      शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय.

4.    कोरोना विषाणुबाबत उपाययोजनांची माहिती.

टॅग्स :उद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस