coronavirus: दिलासादायक! राज्यात समूह संसर्गाचा धोका नाही; सेरो सर्वेक्षणातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 06:55 AM2020-07-07T06:55:42+5:302020-07-07T06:56:22+5:30
राज्यातील सहा जिल्ह्यांत केलेल्या सेरो सर्वेक्षणात कोरोना बाधितांचे प्रमाण केवळ १.१३ टक्के आढळले आहे. परिणामी, समूह संसर्गाचा धोका नसल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.
मुंबई : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) वतीने राज्यातील सहा जिल्ह्यांत केलेल्या सेरो सर्वेक्षणात कोरोना बाधितांचे प्रमाण केवळ १.१३ टक्के आढळले आहे. परिणामी, समूह संसर्गाचा धोका नसल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.
देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने सेरो सर्वेक्षण (रक्त चाचणी) केले होते. पहिल्या टप्प्यात या सर्वेक्षणासाठी राज्यातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यात या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण १.१३ टक्के असल्याचे समोर आले.
कोरोना नियंत्रणात यश
लॉकडाऊनच्या
ॉ काळात, केलेल्या उपाययोजनांमुळे संक्रमण कमी करण्यात आणि कोविड नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचे दिसून आले.
आयसीएमआरच्या निष्कर्षानुसार, ग्रामीण भागाच्या तुलनेत, शहरी भागात हे संक्रमण पसरण्याची शक्यता १.०९ पट अधिक आहे, तर शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये हा धोका १.८९ पट अधिक आहे.
संसर्गित रुग्णांचा मृत्यूदर ०.०८ टक्के आहे. शहरी भागात, विशेषत: झोपडपट्टी भागात अधिक काळजी घ्यावी लागेल, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.