Coronavirus : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? महापौर किशोरी पेडणेकर यांच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 06:37 PM2021-09-07T18:37:23+5:302021-09-07T18:37:55+5:30

Coronavirus In Mumbai: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईकरांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. तसेच तिसरी लाट येणार नाही, तर ती आलेली आहे, असेही त्या म्हणाल्या.

Coronavirus: The third wave of coronavirus in Mumbai? Anxiety increased due to the warning of Mayor Kishori Pednekar | Coronavirus : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? महापौर किशोरी पेडणेकर यांच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली

Coronavirus : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? महापौर किशोरी पेडणेकर यांच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली

Next

मुंबई - एप्रिल-मे महिन्यात मुंबईमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मुंबईमध्ये कोरोनाचा जोर ओसरलेला होता. त्यामुळे अनेक निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईकरांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. तसेच तिसरी लाट येणार नाही, तर ती आलेली आहे, नागपूरमध्ये तशी घोषणा झाली आहे, असेही त्या म्हणाल्या. (The third wave of coronavirus in Mumbai? Anxiety increased due to the warning of Mayor Kishori Pednekar)

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, आता गणपती बाप्पा येणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी आम्ही माझे घर,माझा बाप्पा, अशी घोषणा केली आहे. मी माझा गणपती सोडून कुठेही जाणार नाही. त्याबरोबरच माझे मंडळ, माझा बाप्पा, अशी घोषणाही आम्ही केली आहे. मंडळाचे दहा कार्यकर्ते या बाप्पाची सेवा करतील. तसेच कुणीही मास्कशिवाय इकडे तिकडे फिरणार नाही. तिसरी लाट ही येणार नाही तर आधीच आलेली आहे. नागपूरमध्ये तर त्याची घोषणाही झाली आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

नागपूरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारमधील मंत्री नितीन राऊत यांनी या संदर्भातील माहिती दिली होती. नागपूरमध्ये सलग दोन दिवस दुहेरी आकड्यामध्ये रुग्ण सापडल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली होती. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेतली होती. स्थानिक प्रशासन कोरोनाच्या फैलावाचा वेग रोखण्यासाठी लवकरच निर्बंधांची घोषणा करू शकते, असे संकेत त्यांनी दिले होते.

कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसलेला आहे. दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी काम सुरू केले होते. तसेच हल्लीच त्यांनी तिसऱ्या लाटेबाबत इशाराही दिला होता.  सध्या कोरोनाचा फैलाव कमी झाला असला तरी अजूनही राज्यात कोरोनाचे चार ते पाच हजार रुग्ण दररोज सापडत आहेत.

Web Title: Coronavirus: The third wave of coronavirus in Mumbai? Anxiety increased due to the warning of Mayor Kishori Pednekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.