Coronavirus : कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 01:40 AM2020-03-22T01:40:40+5:302020-03-22T01:41:00+5:30
Coronavirus : प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.
रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी रत्नागिरीत तीन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली. या तिघांवर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.
रत्नागिरी शहरातील बहुतांशी दुकान बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, शनिवारी रात्री काही दुकान सुरू ठेवण्यात आली होती. मजगाव रोड येथील चायनीज सेंटर सुरु ठेवल्याने पोलिसांनी धाड टाकून तेथील मॅनेजरला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर मच्छीमार्केटमधील चिकनचे दुकान सुरु ठेवल्याने कारवाई करण्यात आली. तसेच धनजी नाका येथील किराणा मालाचे दुकान उशीरापर्यंत सुरु ठेवण्यात आले होते. या दुकानात प्रमाणापेक्षा जास्त माणस असल्याने या दुकानावर कारवाई करण्यात आली. या सर्वांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.