CoronaVirus : धक्कादायक! राज्यात कोरोनाचे ५५२ नवे रुग्ण, संख्या पोहोचली ४२०० वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 09:17 PM2020-04-19T21:17:30+5:302020-04-19T21:28:10+5:30
CoronaVirus: आतापर्यंत ५०७ रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत.
मुंबई : राज्यात रविवारी सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने कमी झालेला रुग्णसंख्येचा दर वेगाने वाढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल अशी दिलासाजनक स्थिती दिसत असताना राज्यात रविवारी ५५२ कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईत नवे १३५ रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची संख्या २ हजार ७२४ इतकी झाली आहे. राज्यात १२ मृत्यूंची नोंद झाली, एकूण बळींचा आकडा २२३ वर पोहोचला आहे. तर मुंबईत रविवारी सहा मृत्यू झाले असून बळींचा आकडा १३२ वर पोहोचली आहे.
राज्यात रविवारी झालेल्या १२ मृतांपैकी मुंबईत सहा, मालेगाव येथील चार, सोलापूर मनपा एक आणि अहमदनगर जामखेड येथील रुग्ण आहे. या १२ मृत रुग्णांमध्ये चार पुरुष व ८ महिला आहेत. तसेच, मृतांपैकी ६० वर्षांवरील सहा रुग्ण आहेत. तर पाच रुग्ण ५० ते ६० वयोगटातील आहेत. एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे.
552 new #COVID19 cases and 12 deaths reported in the state today. The total number of positive cases stands at 4200 now. Total 223 deaths reported till now, while 507 patients have been discharged after full recovery: Health Department, Maharashtra pic.twitter.com/1y22wlBst2
— ANI (@ANI) April 19, 2020
मालेगाव येथे मृत्यू झालेल्या चार रुग्णांना इतर काही आजार आहेत का याविषयी तपासणी सुरु आहे, अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. उर्वरित आठ जणांपैकी सहा रुग्णांमध्ये ७५ टक्के मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७२ हजार २३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५०७ रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: २७२४ (१३२)
ठाणे: २० (२)
ठाणे मनपा: ११० (२)
नवी मुंबई मनपा: ७२ (३)
कल्याण डोंबवली मनपा: ६९ (२)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ५
मीरा भाईंदर मनपा: ७१ (२)
पालघर: १७ (१)
वसई विरार मनपा: ८५ (३)
रायगड: १३
पनवेल मनपा: २७ (१)
ठाणे मंडळ एकूण: ३२१४ (१४८)
नाशिक: ४
नाशिक मनपा: ५
मालेगाव मनपा: ७८ (६)
अहमदनगर: २१ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: १ (१)
धुळे मनपा: ०
जळगाव: १
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: १
नाशिक मंडळ एकूण: १२१ (१०)
पुणे: १७ (१)
पुणे मनपा: ५४६ (४९)
पिंपरी चिंचवड मनपा: ४८ (१)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: १५ (२)
सातारा: ११ (२)
पुणे मंडळ एकूण: ६३७ (५५)
कोल्हापूर: ३
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४० (१)
औरंगाबाद:०
औरंगाबाद मनपा: ३० (३)
जालना: १
हिंगोली: १
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३)
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०
लातूर मंडळ एकूण: १२
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ९
अमरावती: ०
अमरावती मनपा: ६ (१)
यवतमाळ: १४
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ४८ (३)
नागपूर: २
नागपूर मनपा: ६७ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ७२ (१)
इतर राज्ये: १३ (२)
एकूण: ४२०० (२२३)
(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्धकरून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत. तसेच मुंबई मनपा कार्यक्षेत्रामध्ये दिनांक १२ एप्रिल २०२० पासूनच्या नवीन निदान झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६३५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.