मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आहे. एकीकडे मुंबईत दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांना कोरोनाचे गांभिर्य नसल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता दिलेली नसतानाही मुंबईकर आज अचानक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. कांदिवलीहून मुंबईकडे खासगी वाहनाने निघालेल्या या मुंबईकरांमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झाली आहे. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर आल्याने वेस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत.चौथ्या टप्प्यातील सुरू होऊन एकच दिवस झाला आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची प्रवासाची सूट देण्यात आलेली नाही. असं असतानाही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर नेहमीप्रमाणे जशी वाहतूक कोंडी होते, तशीच वाहतूक कोंडी आज पाह्यला मिळाली. कांदिवली, मालाड, जोगेश्वरीमधील अनेक लोक खासगी वाहने घेऊन मुंबईला जाण्यासाठी घराबाहेर पडल्याने कांदिवलीपासून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी झाली आहे
coronavirus: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा, रेड झोन, लॉकडाऊनचे तीन तेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 1:00 PM