coronavirus: दिल्लीहूून पुण्यापर्यंत विद्यार्थ्यांसाठी धावणार रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:39 AM2020-05-13T07:39:25+5:302020-05-13T07:39:45+5:30
दिल्लीतील विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया दिल्ली सरकारने पूर्ण केली आहे. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना स्क्रीनिंगच्या संदेशाची प्रतीक्षा आहे. कदाचित १५ तारखेला स्क्रीनिंग होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर दिल्लीत अडकलेल्या १,४०० विद्यार्थ्यांना १६ मे रोजी महाराष्ट्रात परत पाठविण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला केलेल्या सूचनेनंतर रेल्वेने भुसावळ-नाशिक- कल्याण-पुणे या मार्गाला संमती देण्यात आली आहे.
दिल्लीतील विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया दिल्ली सरकारने पूर्ण केली आहे. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना स्क्रीनिंगच्या संदेशाची प्रतीक्षा आहे. कदाचित १५ तारखेला स्क्रीनिंग होण्याची शक्यता आहे. परतीच्या रेल्वेचे नियोजन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ही रेल्वे भुसावळ- नाशिक- कल्याण- पुणे अशी धावणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना घरी जाणे सुलभ होईल.
आकाश जगताप या विद्यार्थ्याने सांगितले, ‘‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच ‘कधी येणार?’ अशी विचारणा आई-वडील करीत होते. आता महाराष्ट्र सरकारमुळे घरी जाण्याची व्यवस्था झाली आहे. पुण्यात पोहोचल्यावर तेथून एसटी बसने घरी जाता येईल. बार्टीच्या अधिकाऱ्यांनीही याच रेल्वेने महाराष्ट्रात परतण्याची सूचना केली आहे. प्रवासात आरोग्य चांगले राहावे, एवढीच अपेक्षा आहे.’’
१ हजार ३८५ मुलांची अंतिम यादी आम्ही दिल्ली सरकारला पाठवली आहे. सर्व विद्यार्थ्यांना याच रेल्वेने पाठविण्यात येणार आहे. घरी जाण्याबाबत अनेकजण अद्यापही संभ्रमात आहेत. त्यामुळे अनेक नावे कमी झाली आणि काही नावे अखेरच्या क्षणी आली. यूपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निर्णय आतापर्यंत आलेला नाही. लॉकडाऊन कधी उघडेल, या ची काही शाश्वती नसताना दिल्लीत राहणे कठीण आहे. अनेक विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल सुरू आहेत. त्यामुळे घरी जाण्याचाच निर्णय योग्य आहे, असे एका विद्यार्थ्याने नमूद केले.
नागपूरच्या विद्यार्थ्यांची अडचण
च्१६ मे रोजी रेल्वेने जाणाºया नागपूरच्या विद्यार्थ्यांना भुसावळ स्थानकावर उतरावे लागणार आहे. नंतर त्यांना भुसावळ ते नागपूर बसने प्रवास करावा लागेल. आमच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.