नवी दिल्ली/मुंबई : देशभरातील सर्व नियमित मेल, एक्स्प्रेस व उपनगरी रेल्वेगाड्यांची वाहतूक येत्या १२ ऑगस्टपर्यंत बंद राहील, असे रेल्वे मंडळाने गुरुवारी जाहीर केले. २४ मार्चपासून रेल्वेची सर्व प्रवासी वाहतूक बंद आहे. ती आणखी किमान दीड महिना तरी सुरु होणार नाही, हे या घोषणेवरून स्पष्ट झाले. मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेºया सुरूच राहतील मात्र याव्यतिरिक उपनगरीय लोकल फेऱ्यांबाबत निर्णय योग्यवेळी घेण्यात येईल असे रेल्वे अधिकाºयाने सांगितले आहे. नियमित वेळापत्रकांतील गाड्यांच्या १ जुलै ते १२ ऑगस्ट या काळातील सर्व आरक्षणेही रेल्वेने रद्द केली आहेत.रेल्वेची ऑगस्टपर्यंतची सर्व आरक्षित तिकिटे रद्द१ जुलै ते आॅगस्टच्या मध्यापर्यंत वेळापत्रकातील नियमित गाड्यांनी प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी केलेली सर्व आरक्षणे रेल्वेने रद्द केली आहेत. या प्रवाशांना त्यांनी भरलेले पैसे पूर्णपणे परत केले जातील. ज्यांनी आॅनलाईन आरक्षण केले असेल, त्यांचा परतावा परस्पर बँकेत जमा केला जाईल. रेल्वेच्या आरक्षण खिडकीवरून आरक्षण केलेल्यांना प्रवासाच्या तारखेपासून १२० दिवसांत परताव्यासाठी फॉर्म भरून तो खिडकीवर द्यावा लागेल.या निर्णयामुळे १५ आॅगस्टपर्यंत नियमित गाड्या सुरू होणार नाहीत, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण रेल्वेने त्याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. रेल्वेने त्यांच्या वेळापत्रकांतील सर्व नियमित प्रवासी गाड्या २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद केल्या आहेत व त्या पुन्हा केव्हा सुरूहोतील, हेही अद्याप नक्की नाही. त्यामुळे आरक्षण केलेल्या सर्व प्रवाशांचे पैसे रेल्वे कोणतीही कपात न करता परत देत आहे. सध्या रेल्वे फक्त महत्त्वाच्या शहरांदरम्यान १०० विशेष गाड्यांच्या जोड्या चालवीत आहे.>120 दिवसांपर्यंत आधी रेल्वेचे आरक्षण करता येते. म्हणजे प्रवाशांनी आॅगस्टच्या मध्यापर्यंतच्या प्रवासाचे आरक्षण एप्रिलच्या मध्यापासून केले आहे.>30जूनपर्यंतची रेल्वेने सर्व आरक्षणे रद्द करून पैसे परत देण्याचे याआधी ठरविले होते. आता हा निर्णय आॅगस्ट मध्यापर्यंतच्या आरक्षणास लागू करण्यात आला आहे.