Coronavirus: मुंबईत दोन महिलांना कोरोनाची लागण; महाराष्ट्रात आकडा वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 10:20 AM2020-03-19T10:20:46+5:302020-03-19T10:55:17+5:30
मुंबईमध्ये दोन कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण सापडले असून दोन्ही महिलाच आहेत.
मुंबई : मुंबईमध्ये दोन कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण सापडले असून दोन्ही महिलाच आहेत. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 47 वर पोहोचला आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईमध्ये 22 वर्षांची तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ती युरोपमधून भारतात दाखल झाली होती. तर दुसरी पॉझिटिव्ह महिला 49 वर्षांची असून उल्हासनगरची आहे. ही महिला दुबईवरून भारतात आली होती.
Two women test positive for coronavirus in Mumbai on Thursday, total cases in Maharashtra now 47: Officials
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2020
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली होती. त्यानंतर आता गुरुवारी (19 मार्च) 146 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 1, दिल्लीमध्ये 11, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 13, केरळमध्ये 27, महाराष्ट्रात 42, पंजाबमध्ये 3, तेलंगणामध्ये 12, राजस्थान 7, उत्तर प्रदेशमध्ये 17, लडाख 8, तमिळनाडू 2, जम्मू-काश्मीर 4 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
भाजपा कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून केले गोमूत्र प्राशन; पण...
कच्च्या तेलाने गाठला तब्बल 16 वर्षांपूर्वीचा निचांक; मुंबईतील आजचे दर पहा
Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर