Join us

Coronavirus : ...अन् उद्धव ठाकरेंनी स्वतः घेतलं स्टेअरिंग हातात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 5:53 PM

Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही.

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका वेळीच ओळखला नाही, तर परिस्थिती आणखी चिंताजनक होणार आहे. गेल्या 24 तासांत मुंबई शहर उपनगरात 68 नव्या कोरोना (कोविड-19) रुग्णांचे निदान झाले असून आता महानगरातील कोरोना बाधितांची संख्या 526 वर जाऊन पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही. वांद्रे येथील ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावरील चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चेने सोमवारी खळबळ उडाली. 

चहा विक्रेता कोरोधाबाधित असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे मातोश्रीच्या आसपासचा परिसरही सील करण्यात आला आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः आपल्या कारचं  स्टेअरिंग हातात घेतलं. कार स्वतः चालवली आणि ते कॅबिनेटच्या बैठकीत पोहचले. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन त्यांनी आपल्या कार चालकाला सुट्टी दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच आज कॅबिनेटच्या बैठकीत जाण्यासाठी त्यांनी स्वतः कार चालवली आहे. कार चालकाला सुट्टी देण्याचा त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद आहे.

वांद्रे येथील कलानगरमध्ये उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान आहे. या बंगल्याच्या मागच्या बाजूस साहित्य सहवासाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एक चहाची टपरी आहे. या चहा विक्रेत्याला सर्दी व कफचा त्रास होत होता. त्यामुळे काही दिवसांपासून त्यांनी टपरी बंद ठेवली होती. त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या कोरोनाबाबतच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तो कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 4000 वर पोहोचला आहे. तर 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला असून अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा आजारा वेगाने पसरत चालला आहे.जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 75,896 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 13,58,857 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 2,90,643 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : 'घरचे आजारी पडले तर...', कुटुंबीयांच्या आठवणीने डॉक्टरचे डोळे पाणावले

Coronavirus : फ्रान्समध्ये कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत तब्बल 833 जणांचा मृत्यू

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो 

Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारी

Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरेमुंबईभारतमृत्यू