coronavirus : महाराष्ट्रात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता - राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 06:41 PM2020-04-24T18:41:23+5:302020-04-24T18:42:00+5:30

राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली.

coronavirus: Union Health Minister approves 'pull testing' and 'plasma therapy' in Maharashtra - Rajesh Tope | coronavirus : महाराष्ट्रात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता - राजेश टोपे

coronavirus : महाराष्ट्रात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता - राजेश टोपे

googlenewsNext

मुंबई - कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 

राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले.

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: coronavirus: Union Health Minister approves 'pull testing' and 'plasma therapy' in Maharashtra - Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.