Coronavirus Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 09:06 PM2021-03-25T21:06:29+5:302021-03-25T21:07:45+5:30
Coronavirus Update : मुंबईत सध्या ३३ हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण, मार्च २०२० नंतरची सर्वात नोंदवण्यात आली सर्वात मोठी रुग्णवाढ
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना विषाणूची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बुधवारी मुंबईत सर्वाधिक म्हणजे पाच हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर गुरूवारी पुन्हा एकदा मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली.
गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत आतापर्यंतचे सर्वाधिक ५ हजार ५०४ रूग्णांची नोंद करण्यात आली. यापूर्वी बुधवारी सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत ५ हजार ५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २ हजार २८१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. दरम्यान, या कालावधीत मुंबईत १४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या मुंबईत एकून ३३ हजार ९६१ अॅक्टिव्ह केसेस आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 25, 2021
25-Mar; 6:00pm
Discharged Pts. (24 hrs) - 2,281
Total Recovered Pts. - 3,33,603
Overall Recovery Rate - 88%
Total Active Pts. - 33,961
Doubling Rate - 75 Days
Growth Rate (18 Mar-24 Mar) - 0.89%#NaToCorona
मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ११ हजार ६२० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वी बुधवारी राज्यात ५ हजार १८५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. मार्च २०२० नंतरची ही सर्वाधिक नोंद होती. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांच्या दुपटीचा दर ७५ दिवसांवर आला असून रुग्ण बरे होण्याचा दरही ८८ टक्के इतका असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली.