मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ५०५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ६८ जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. तसेच आज एकूण ७ हजार ५३८ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५१,९५६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.७६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६३,५७,८३३ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आजपर्यंत राज्यात १,३४,०६४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली. तर सध्या राज्यातील मृत्यू दर २.१टक्के एवढा आहे. तसेच राज्यात रविवारपर्यंत ४ कोटी ६७ लाख ५८ हजार ९३१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ८ ऑगस्ट २०२१ रोजी ६७,४८२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ९७ लाख २५ हजार ६९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ५७ हजार ८३३ (१२.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख २१ हजार ६८३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ८९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईत ४५९९ सक्रिय रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ही सख्या ४ हजार ५९९ इतकी आहे. तर, रायगडमध्ये १ हजार ९५०, रत्नागिरीत १ हजार ७७५, सिंधुदुर्गात १ हजार ५९३, बीडमध्ये १ हजार ७७२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८६० इतकी आहे.