CoronaVirus Updates: राज्यात दिवसभरात ५ हजार ६०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १३७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 11:12 PM2021-08-10T23:12:43+5:302021-08-10T23:13:52+5:30
CoronaVirus Updates: राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ६६ हजारांपर्यंत खाली आली आहे.
मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ६०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १३७ जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. तसेच आज एकूण ७ हजार ७२० जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५९,६७३ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६३,६३,४४२ झाली आहे. आजपर्यंत राज्यात १,३४,२०१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली. तर सध्या राज्यातील मृत्यू दर २.१ टक्के एवढा आहे.
राज्यात आज, 5,609 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7,720 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 61,59,676 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 66,123 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.8% झाले आहे. pic.twitter.com/iFOPvktiHJ
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 10, 2021
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ६६ हजारांपर्यंत खाली आली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १३ हजार ८९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर त्याखालोखाल ७ हजार २९७ अॅक्टिव्ह रुग्ण सांगली जिल्ह्यात आहेत. सातारा जिल्ह्यात ही संख्या ६ हजार ४६९, अहमदनगर जिल्ह्यात ६ हजार १९२, ठाणे जिल्ह्यात ६ हजार ७० तर मुंबई महापालिका क्षेत्रात ४ हजार ५०१ इतकी आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९९,०५,०९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६३,४४२ (१२.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,१३,४३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६६,१२३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.